हिंगणघाटात महिलांना मोठी संधी, राजकीय चित्र बदलणार

* नप निवडणूक आरक्षण सोडत जाहीर

    दिनांक :08-Oct-2025
Total Views |
हिंगणघाट,
Municipal Council General Election : हिंगणघाट नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीकरिता प्रभागनिहाय आरक्षण सोडत आज ८ रोजी उपविभागीय अधिकारी आकाश अवतारे, नप मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांच्या उपस्थितीत काढण्यात आले. २० प्रभागांमधील ४० सदस्यांसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नामाप्र तसेच सर्वसाधारण श्रेणीसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. या सोडतीनुसार महिलांना पालिकेत सर्वाधिक प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. जवळपास प्रत्येक प्रभागात एकतरी जागा महिलांसाठी आरक्षित असून यामुळे या निवडणुकीत महिला नेतृत्वाचा उदय निश्चित झाला आहे.
 
 
 
j
 
 
प्रभाग १ अ अनुसूचित जाती (सर्वसाधारण), ब सर्वसाधारण (महिला), प्रभाग २ अ मध्ये नामाप्र (महिला), ब सर्वसाधारण, प्रभाग ३ अ नामाप्र (महिला), ब सर्वसाधारण, प्रभाग ४ अ नामाप्र (सर्वसाधारण) ब सर्वसाधारण (महिला), प्रभाग ५ अ नामाप्र (महिला), ब सर्वसाधारण, प्रभाग ६ अ अनुसूचित जाती (महिला) ब सर्वसाधारण, प्रभाग ७ अ नामाप्र (सर्वसाधारण) ब सर्वसाधारण (महिला), प्रभाग ८ अ अनुसूचित जाती (महिला), ब सर्वसाधारण, प्रभाग ९ अ अनुसूचित जाती (सर्वसाधारण), ब सर्वसाधारण (महिला), प्रभाग १० अ अनुसूचित जमाती (सर्वसाधारण), ब सर्वसाधारण (महिला), प्रभाग ११ अ मध्ये नामाप्र (महिला) ब सर्वसाधारण, प्रभाग १२ अ नामाप्र (महिला) ब सर्वसाधारण, प्रभाग १३ अ सर्वसाधारण (महिला) ब सर्वसाधारण, प्रभाग १४ अ नामाप्र (सर्वसाधारण) ब सर्वसाधारण (महिला), प्रभाग १५ अ अनुसूचित जाती (सर्वसाधारण) ब साठी सर्वसाधारण (महिला), प्रभाग १६ अ नामाप्र (सर्वसाधारण), ब मध्ये सर्वसाधारण (महिला), प्रभाग १७ अ मध्ये नामाप्र (महिला) ब मध्ये सर्वसाधारण, प्रभाग १८ अ अनुसूचित जमाती (महिला) ब सर्वसाधारण, प्रभाग १९ अ नामाप्र (सर्वसाधारण) ब मध्ये नामाप्र (महिला), प्रभाग २० अ मध्ये अनुसूचित जाती (महिला) तर ब मध्ये सर्वसाधारण आरक्षित आहे.
 
 
 
या आरक्षणामुळे सर्व समाजघटकांना समान प्रतिनिधित्व मिळाले असून महिला, मागासवर्गीय आणि अनुसूचित समाजातून नव्या नेतृत्वाचा उदय होण्याची शयता वाढली आहे. राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. प्रत्येक पक्ष आता या नव्या आरक्षणावर आपली रणनीती आखत असून, काही ठिकाणी अंतर्गत मतभेद वाढण्याचीही शयता व्यत केली जात आहे. आरक्षण जाहीर होताच शहरातील सर्व राजकीय पक्षांच्या कार्यालयात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.