हिंगणघाटात हाय-प्रोफाइल महिलांच्या नावाची चर्चा

    दिनांक :08-Oct-2025
Total Views |
हिंगणघाट,
municipal-council-president-election : हिंगणघाट नगर परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी यंदा येथील अध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असल्यामुळे संभाव्य उमेदवारांसाठी काही हाय प्रोफाइल नावांची चर्चा सुरू आहे. नपचे माजी अध्यक्ष प्रेम बसंतानी यांच्या पत्नी व माजी नगरसेवक जया, सिनेट सदस्य व शिक्षण महर्षी उमेश तुळसकर यांच्या पत्नी उपप्राचार्य नयना तुळसकर, राकाँकडून डॉ. सुरभी कोठारी, राका शरद पवार गटातर्फे अतुल वांदीले यांच्या पत्नी स्वाती, गजू कुबडे यांच्या पत्नी आरती, शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेंद्र खुपसरे यांच्या पत्नी सीमा या हाय प्रोफाईल महिलांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.
 
 
hgt
 
नप निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झाली नसली तरी नप अध्यक्षपदाचे आरक्षण हें सर्वसाधारण महिलांसाठी खुले झाल्याने कही ख़ुशी कही गम अशी स्थिती असली तरी मी नाही तर माझी घरवाली या न्यायाने अनेक नेते उत्सुक आहेत. माजी नगरसेवक छाया सातपुते या पहिली पसंती असू शकतात. स्व. भगवानजी आंबटकर यांची पुण्याई तसेच ज्येष्ठ बंधू माजी आमदार स्व. रामदास आंबटकर यांचा वारसा म्हणूनही छाया सातपुते यांच्याकडे बघितले जाऊ शकते. पक्षात अन्य उमेदवारात सतत चार वेळा नगरसेविका राहिलेल्या अर्चना जोशी, भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्ष अनिता मावळे या इच्छुकांच्या यादीत आहेत.
 
 
राकाँ व भाजपा यांच्यात युती न झाल्यास सुरभी कोठारी यांच्या शिवाय माजी आमदार राजू तिमांडे यांच्या पत्नी नंदा यांचेही नाव पुढे येण्याची शयता आहे. त्या एकदा नगरसेविका राहिलेल्या आहेत. महायुतीतील तिसरा घटक पक्ष असलेला एकनाथ शिंदे यांची शिवसेना या ठिकाणी औषधालाही नसल्याने तो पक्ष या निवडणुकीत अदखल पात्र आहे.
 
 
 
महाविकास आघाडीतील राकाँ शरद पवार गटाकडून सतत चार वेळा नगरसेविका राहिलेल्या शुभांगी डोंगरे यांचे नाव अग्रक्रमावर असले तरी भाजपा सोडल्यानंतर त्यांनी अजून कोणत्याही पक्षात प्रवेश घेतलेला नाही त्यामुळे त्या नेमया कोणत्या पक्षाकडून उमेदवारी घेतात की अपक्ष म्हणून नशीब अजमावतात हें सध्या तरी गुलदस्त्यात आहे. या आघाडीत ही जागा उबाठा गटाकडे गेल्यास त्यांच्या जवळ सतत चार वेळा नगरसेविका राहिलेल्या निता धोबे यांचा एकमेव सक्षम पर्याय असला तरी शिवसेना पक्षाचे सुरुवातीपासूनचे निष्ठावंत शिवसैनिक असलेले राजू खुपसरे यांच्या पत्नी सीमा यांच्या साठी राजू खुपसरे पक्षश्रेष्ठींसोबत असलेल्या आपल्या संबधाचा उपयोग करून शकतात.
 
 
माजी राज्यमंत्री अशोक शिंदे भगिनीं व माजी नप अध्यक्ष सुधा शिंदे यांच्या साठी उमेदवारी मागू शकतात. शिवसेनेसोबत प्रामाणिकपणे मागील तीस वर्षापासून निष्ठेने असलेल्या प्राची पाचखेडे या सुद्धा उमेदवार असू शकतात. काँग्रेसच्या वाट्याला ही जागा गेली तर प्रवीण उपासे पत्नी सोनाली यांच्यासाठी जोरदार फिल्डिंग लावून आहेत. माजी नप अध्यक्ष पंढरीनाथ कापसे यांच्या पत्नी रजनी या उमेदवारीच्या चर्चेत दिसत आहेत. प्रहारचे पूर्व विदर्भ प्रमुख गजू कुबडे पत्नी आरती यांच्या साठी फिल्डिंग लावून आहेत.