विवाहितेची आत्महत्या, पती-सासूवर गुन्हा दाखल

    दिनांक :08-Oct-2025
Total Views |
अनिल कांबळे


नागपूर,
married woman suicide लग्नाला बरीच वर्षे हाेऊनही मुलबाळ हाेत नसल्याने पती आणि सासूने विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. त्याला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. पाेलिसांनी तपासाअंती पती आणि सासूवर आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा नाेंदविला आहे. नितीन दिनकर पाटील (45) आणि शारदा दिनकर पाटील (65) दाेन्ही रा. लियाे पॅराडाईज, गाेकुळ साेसायटी, बाेरगाव अशी आराेपींची नावे आहेत. अर्चना नितीन पाटील (45) असे मृत विवाहितेचे नाव आहे.
 

married woman suicide  
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 एप्रिल 2009 राेजी नितीनचे मुंबईच्या ऐराेली येथील रहिवासी अर्चनाशी रितिरिवाजाने लग्न झाले हाेते. अर्चनाचे वडील कृष्णत हरगुडे यांनी धुमधडाक्यात मुलीचा विवाह लावून दिला हाेता. मात्र लग्नाला बरीच वर्षे हाेऊनही नितीन आणि अर्चनाला बाळ हाेत नव्हते. नितीन आणि त्याची आई शारदा यासाठी अर्चनाला दाेष देत हाेते. तिला शिविगाळ करून मारहाण करीत हाेते. याबाबत अर्चनाने तिच्या कुटुंबीयांना बरेचदा माहिती दिली हाेती. अनेकदा समजवल्यानंतरही आराेपी अर्चनाचा छळ करीत हाेते. दरराेज तिला टाेमणे देत हाेते. आराेपींकडून हाेत असलेल्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून अर्चनाने गत 16 सप्टेंबरच्या सायंकाळी राहते घरी छताच्या पंख्याला दाेरी बांधून गळास लावला. पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला. तपासात अर्चनाचे वडील कृष्णत यांनी मुलीवर हाेत असलेल्या अत्याचारांची माहिती दिली. नितीन आणि शारदाच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आराेप लावला. पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून दाेघांनाही अटक केली आहे.