‘झुंड’चित्रपटातील कलाकार प्रियांशू क्षत्रियचा खून

जरीपटका परिसरात घटली घटना

    दिनांक :08-Oct-2025
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,

Jhund movie actor Priyanshu Kshatriya नागराज मंजुळे दिग्दर्शित आणि मेगास्टार अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘झुंड’चित्रपटात भूमिका साकारणारा कलाकार प्रियांशू क्षत्रिय याची जुन्या वैमनस्यातून हत्या करण्यात आली. ही थरारक घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास जरीपटक्यात घडली. या प्रकरणी पाेलिसांनी एका आराेपीला अटक केली आहे.
 
 

Jhund movie actor Priyanshu Kshatriya  
 
 
 
विजय बारसे  Jhund movie actor Priyanshu Kshatriya यांनी झाेपडपट्टीतील मुलांची फुटबाॅल संघ तयार करुन त्यांना ओळख निर्माण करुन दिली हाेती. त्या सत्य घटनेवर आधारित नागराज मंजुळे यांनी झुंड चित्रपट तयार केला हाेता. यात अमिताभ बच्चन यांनी मुख्य भूमिका साकारली हाेती. याच चित्रपटात नागपुरातील युवकांचा समावेश करण्यात आला हाेता. त्यामध्ये प्रियांशू क्षत्रिय या युवकाने फुटबाॅल खेळाडूची भूमिका साकारली हाेती. प्रियांशू हा सुरुवातीपासूनच गुन्हेगारी प्रवृत्तीचा हाेता. यापूर्वी त्याच्यावर चाेरीचा गुन्हा दाखल झाला हाेता. तसेच रेल्वेतील प्रवाशांचे माेबाईल चाेरीचाही गुन्हा त्याच्यावर दाखल हाेता. त्याचा गेल्या काही दिवसांपासून आराेपी ध्रुव शाहू याच्याशी पैशांवरुन वाद सुरु हाेता. दाेघांमध्ये एकदा मारामारीसुद्धा झाली हाेती. मात्र, मित्रांनी मध्यस्थी केल्याने वाद मिटला हाेता. मंगळवारी मध्यरात्रीनंतर जरीपटक्यातील नारा परिसरात ध्रुव शाहू आणि प्रियांशू क्षत्रिय यांच्यात वाद झाला. या वादातून ध्रुवने वायरने हल्ला करुन त्याला गंभीर जखमी केले. वस्तीतील नागरिकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या प्रकरणी जरीपटका पाेलिसांनी गुन्हा दाखल केला असून आराेपी ध्रुवला अटक केली. या हत्याकांडात अन्य आराेपी आहेत का, याचा शाेध ठाणेदार अरुण क्षिरसागर घेत आहेत.
 
 
काेण आहे हा प्रियांशू
 
प्रियांशू हा एक चांगला फुटबाॅलपटू हाेता. फुटबाॅल खेळल्यामुळे त्याची झुंड या चित्रपटासाठी निवड झाली हाेती. चुकीच्या संगतीत पडून त्याला अंमली पदार्थांचे व्यसन लागले. त्यासाठी त्याने चाेरीही सुरू केली. प्रियांशूचे वडील राेजंदारी मजूर आहेत. त्याला तीन माेठ्या बहिणीही आहेत.
 
 
 
अशी झाली चित्रपटासाठी निवड
 
नागपुरात रेल्वेच्या ट्रॅक जवळच प्रियांशूचे बालपण गेले. ’मी ट्रेनमधून काेळसा पाडायचाे आणि आम्ही ताे गाेळा करून विकायचाे. एक दिवस ट्रेनमधून काेळसा पाडत असतानाच नागराज मंजुळे हे कारमधून झाेपडपट्टीत आले. ते कारमधून उतरले, त्यांच्याकडचा कॅमेरा वगैरे असल्याने न्यूजवाले आहेत, असे त्याला वाटले. त्यांनी कॅमेरा काढला अन् वस्तीत फिरवला. त्यांचा कॅमेरा त्या मुलांवर राेखला गेला. मग मंजुळे यांनी त्याला चित्रपटासाठी विचारणा केली हाेती.’अशाप्रकारे त्याला चित्रपट मिळाला हाेता.