तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Samaka Ayurveda देवी सामका महिला बहुउद्देशीय संस्था संचालित सामका आयुर्वेद योग व वेलनेस सेंटर, गोधणी येथे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त भगवान धन्वंतरी ध्यान मंदिरामध्ये भव्य आयोजन करण्यात आले होते. मध्यरात्री बारानंतर आरोग्यवर्धक पौष्टिक खीर व दुग्ध वितरणाने कार्यक्रमास प्रारंभ झाला.
या प्रसंगी सिनेरसिक मंचाचे यशवंत पाटील व सहकाèयांनी सुरेल भावगीतांची मैफल सादर केली. सुमधुर स्वरांमध्ये चंद्राचे गीत सर्वांनी एकत्रित गाऊन वातावरण अधिक आनंदी केले. कार्यक्रमाचे संचालन हिंगमिरे यांनी केले.वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे स्वामी विवेकानंद स्मारकासाठी देणगी प्रदान करण्यात आली. उपस्थित सर्व समुदायातील नागरिकांनी पौष्टिक खिरीचे सेवन करून या पारंपरिक आरोग्यपूर्ण उत्सवाचा आनंद घेतला. संस्थेचे मुख्य पवार व देवयानी पवार यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम यशस्वी झाला. वैद्य पंकज पवार यांनी कोजागिरी पौर्णिमेचे आरोग्यदायी महत्त्व स्पष्ट केले. डॉ. विवेक पवार व मित्रपरिवारांनी खिरीचे वितरण केले. संस्थाचिव चंदा व सामका आयुर्वेद चमूंनी परिश्रम घेतले.