लाडक्या बहिणींची दिवाळी होणार गोड...लवकरच येणार ३ हजार!

    दिनांक :08-Oct-2025
Total Views |
मुंबई,
ladali-bahin-will-get-3-thousand राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी पूर्ण झालेल्या महिला लाभार्थींच्या खात्यात लवकरच ३००० रुपये जमा होणार आहेत, ज्यामुळे या दिवाळीत त्यांची आर्थिक मदत होईल. दरम्यान, योजनेत पात्र असूनही काही लाभार्थी गेल्या तीन हप्त्यांपासून आपला लाभ मिळवू शकलेले नाहीत. याच पार्श्वभूमीवर ई-केवायसी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी आणि त्रासाची माहिती समोर आली आहे.

ladali-bahin-will-get-3-thousand 
 
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र ठरलेल्या ५२,११० लाभार्थ्यांची कागदपत्रे तपासण्यात आली आहेत. या तपासणीत ३,५०० महिला अपात्र ठरल्या, ज्या ६५ वर्षांवरील किंवा एका कुटुंबातील दोन पेक्षा अधिक सदस्य असल्याचे उघड झाले. तथापि, ४८,५०० हून अधिक महिला पात्र ठरल्या असून त्यांना गेल्या तीन हप्त्यांपासून लाभ मिळत नव्हता. सध्या योजनेची प्रक्रिया ई-केवायसीच्या कचाट्यामध्ये अडखळत आहे. महिलांना रात्रभर मेहनत करून ई-केवायसी पूर्ण करावी लागते, त्याचबरोबर ओटीपी एरर आणि तांत्रिक अडचणींचाही सामना करावा लागत आहे.
 
सध्या सरकारने ई-केवायसीसाठी दोन महिन्यांची मुदत दिलेली असून, या कालावधीत पात्र महिलांना दोन महिन्यांचे हप्ते मिळणे अपेक्षित आहे. मात्र, जर दोन महिन्यांच्या आत ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाली नाही, तर सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे हप्ते मिळतील की नाही, असा प्रश्न लाभार्थींमध्ये निर्माण झाला आहे. महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, ई-केवायसी प्रक्रियेत येणाऱ्या तांत्रिक अडचणींवर काम सुरू आहे. सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, पात्र महिलांना या दोन महिन्यांच्या मुदतीत हप्ते मिळणार आहेत आणि त्यांच्यावर कोणतेही अडथळे येऊ नयेत, याची दक्षता घेतली जात आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना लवकरच ३००० रुपये हप्ते मिळून त्यांची दिवाळी गोड होईल.