नागपूर,
leopard spotted AIIMS मिहान परिसरातील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) या रुग्णालयाच्या मुख्य मार्गावर बिबट्या आढळल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर वनविभागाने तातडीने एक पथक पाठवून शोध मोहीम हाती आहे. मिहान परिसरात रात्रीच्या वेळी असा अनुभव अनेकवेळा आला असून याबाबत वनविभागाला कळविल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी वन विभागाला दिली आहे. बिबट्या आढळल्याचा व्हिडीओ मंगळवारी व्हायरल झाल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून अधिक काळजी घेण्याचे आवाहन वन विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी केले आहे. तर एम्स रुग्णालय प्रशासनाने सुध्दा सतर्कता बाळगत रुग्णालय कर्मचार्यांना सावधगिरीची सुचना केली आहे.
बिबट्या दिसल्याच्या अनेक घटना
नागपूरमध्ये अनेकदा बिबट्या दिसल्याच्या घटना घडल्या आहेत.आयटी पार्क परिसरात चार वर्षांपूर्वी मे महिन्यात बिबट्या दिसला होता. तर गोरेवाडा, कळमेश्वर मार्गावर सुध्दा बिबट्याचा वावर दिसून आला आहे. बुटीबोरी वनपरिक्षेत्रातील चिमणाझरी शिवारात रेल्वेच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाला होता. याशिवाय गोकुळ सोसायटीत दिसला होता. यामुळे मॉर्निंग वॉकला जाणार्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. नागपूरच्या परिसरात बिबट्यांच्या अस्तित्वाची आणि मानवी वस्त्यांजवळील हालचालींची पुष्टी होते.