एमबीबीएसच्या विद्यार्थिनीने घरातच घेतला गळफास!

    दिनांक :08-Oct-2025
Total Views |
सोलापूर,
MBBS student hangs herself वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीने दुःखद मार्ग स्वीकारला आहे. सोलापूरच्या जुळे परिसरातील आयएमएस शाळेसमोरील एका घरात एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षातील शिक्षण घेणारी साक्षी सुरेश मैलापुरे (वय २५) या तरुणीने छताच्या पंख्याला स्कार्फच्या साहाय्याने गळफास घेत आपले जीवन संपवल्याची घटना समोर आली.
 
 
MBBS student hangs herself
 
घटनेची माहिती साक्षीच्या आईला लक्षात आली आणि तिने तत्काळ नातेवाइकांच्या मदतीने साक्षीला फासावरून खाली उतरवले. त्यानंतर तिला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. ही घटना परिसरात हळहळ निर्माण करत आहे. साक्षी ही अभ्यासात हुशार, शांत आणि मेहनती विद्यार्थिनी होती. मात्र, तिच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची नोंद विजापूर नाका पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस सखोल तपास करत आहेत. घटनास्थळी पंचनामा केला जात असून, मोबाइल आणि इतर पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.