दिवाळीनंतर उडणार नगर पालिका निवडणुकांचे फटाके

प्रभाग निहाय आरक्षण जाहीर, युती-आघाडीनंतर स्पष्ट होईल राजकीय समिकरण

    दिनांक :08-Oct-2025
Total Views |
वाशीम,
Washim municipal corporation राज्य निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार होवू घातलेल्या आगामी नगर पालिका व नगर पंचायतीच्या निवडणुकांच्या अनुषंगाने नगराध्यक्ष पदाचे आरक्षण निश्चित झाल्यानंतर ८ ऑटोंबर रोजी प्रभाग निहाय आरक्षण सोडत काढण्यात आली. या आरक्षण सोडतीने राजकीय वर्तुळात कही खुशी, कही गम अशी स्थिती निर्माण झाली.निवडणुकीची तयारी बघता दिवाळीनंतर निवडणुकांचे फटाके उडणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
 

municipal elections 2025, Washim municipal corporation 
जिल्ह्यातील मानोरा Washim municipal corporation नगरपंचायतीचा कार्यकाळ संपण्यास अवधी असल्याने वाशीम, कारंजा, मंगरुळनाथ व रिसोड नगर पालिका तसेच मालेगाव नगर पंचायत निवडणुकीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. दरम्यान,वाशीम पालिकेतील १६ प्रभाग, रिसोड नगर पालिकेत ११, मंगरुळनाथ १० तर कारंजा नगर पालिकेत १५ प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. तर नगराध्यक्षाची निवड ही थेट जनतेतून होणार असून नुकतेच मुंबई येथे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले. यामध्ये रिसोड वगळता सर्वच ठिकाणी ओबीसी तसेच महिला आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यामुळे अनेकांच्या मनसुब्यांवर पाणी फेरल्या गेले. अशात बुधवारी कारंजा, मंगरुळनाथ, रिसोड व वाशीम या चारही नगर पालिकेचे प्रभाग निहाय आरक्षण निश्चितीचा कार्यक्रम तालुकास्तरावर पार पडला. यामध्ये सुध्दा मर्जीतल्या प्रभागात आरक्षण पडल्याने अनेक इच्छूकांचा हिरमोड झाला.
 
 
असे आहे प्रभाग निहाय आरक्षण
वाशीम नगर Washim municipal corporation पालिकेत एकूण १६ प्रभाग असून यापैकी क्रमांक १,२,३ (अ) अनुसुचित जाती तर ४,७,९ (अ) अनुसुचित जाती महिलांसाठी आरक्षीत करण्यात आले. प्रभाग ६, १०, ११, १५, १६ (अ) हे नामाप्र महिला तर ५,१२,१३,१४ (अ) नामाप्रसाठी आरक्षीत आहेत. याशिवाय १, २, ३, ५, १२, १३, १४ (ब) तसेच ८ (अ) हे सर्व साधारण महिलांसाठी राखीव करण्यात आले आहेत.
पुढार्‍यांचा स्वबळाचा नारा
जिल्ह्यात वाशिम, रिसोड, मंगरुळनाथ व कारंजा या नगर पालिका व मालेगाव नगर पंचायत निवडणुकीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. नगराध्यक्ष् तसेच प्रभागातील आरक्षण निश्चितीनंतर सर्वपक्षीय पुढारी कामाला लागले आहेत. मात्र, अद्याप युती-आघाडी बाबत अनिश्चितता असल्याने संभ्रम कायम असला तरी सर्वच प्रमुख पक्ष या निवडणुका स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याने सर्व पक्षात इच्छूकांची गर्दी वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर युती तसेच आघाडीचा निर्णय झाल्यास प्रमुख राजकीय पक्षांना नाराजांना सांभाळण्याचे आव्हान पेलावे लागणार असल्याचा अंदाज राजकीय जानकार व्यक्त करीत आहेत.