सिंदी (रेल्वे),
municipal-general-election : पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १० प्रभागातील २० उमेदवारांचे आरक्षण आज बुधवार ८ रोजी काढण्यात आले. यात १४ जागा सर्वार्थाने राखीव असून केवळ ६ जागा मोकळ्या राहिल्या. नगराध्यक्षपद देखील खुले आहे.
यंदा नोव्हेंबर महिन्यात होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी विभागीय आयुत श्रीपती मोरे आणि मुख्याधिकारी विजयकुमार आश्रमा यांच्या उपस्थितीत २० जागांसाठी सोडत काढण्यात आली. त्यात अनु. जमातीच्या २ जागा, एक महिला, अनु. जातीसाठी २ जागा त्यापैकी एक जागा प्रभाग १० मध्ये महिलेसाठी राखीव ठरली. ओबीसीसाठी ६ जागा असून ४ जागांवर महिलांना संधी आहे. खुल्या गटातील ३ जागा महिलांकरिता आरक्षित असून ५ जागा महिला-पुरुषांपैकी कोणीही लढवू शकतात. यंदा तीन नगरसेवक वाढतील, असे सोडतीकडे बघता दिसून येत आहे.
प्रभाग १ अ मध्ये अनु. जमाती महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग २ अ मध्ये अनु. जमाती, ब सर्वसाधारण महिला, प्रभाग ३ अ मध्ये सर्वसाधारण महिला, ब मध्ये सर्वसाधारण, प्रभाग ४ अ मध्ये नामाप्र, ब सर्वसाधारण महिला, प्रभाग ५ अ नामाप्र महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग ६ अ मध्ये नामाप्र, ब मध्ये नामाप्र महिला, प्रभाग ७ अ मध्ये नामाप्र महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग ८ अ मध्ये नामाप्र महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग ९ अ मध्ये अनु. जाती, ब सर्वसाधारण महिला, प्रभाग १० अ मध्ये अनु. जाती महिला तर ब मध्ये सर्वसाधारण अशी सोडत निघाली आहे.