‘जागर शारदेचा, रंग मेहंदीचा’ कार्यक्रमात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

    दिनांक :08-Oct-2025
Total Views |
नागपूर,
Nagpur News भारतीय जनता पार्टी आयोजित ‘जागर शारदेचा, रंग मेहंदीचा’ या खासदार सांस्कृतिक महोत्सवात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाला माजी नगरसेविका मीनाक्षी तेलगोटे, शहर महामंत्री वंदना शर्मा, महिला मोर्चा महामंत्री वर्षा गोडबोले, महिला मोर्चा अध्यक्ष सपना हिरणवार, वार्ड अध्यक्ष शक्ती प्रमुख अर्चना शर्मा आणि हर्षा आयचित या मान्यवरांनी उपस्थिती लावली.
 
Nagpur News
 
कार्यक्रमाचे नेतृत्व सपना रोडी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उज्ज्वला भरडे, स्मिता सावदेकर, शुभांगी अंधारे, शुभांगी रोडे आणि कल्पना वाराणशीवार यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. Nagpur News या उपक्रमात एकूण २१० महिलांच्या हातावर मेहेंदी काढण्यात आली, ज्यामुळे वातावरण सणासुदीचे आणि सांस्कृतिक रंगांनी भरले.
सौजन्य: सपना रोडी, संपर्क मित्र