भरधाव खासगी बसच्या धडकेत विद्यार्थिनी ठार

    दिनांक :08-Oct-2025
Total Views |
अनिल कांबळे
 
 

नागपूर,
Bhagyeshree Tembhre accident भरधाव खासगी बसने एका दुचाकीस्वार विद्यार्थिनीला धडक दिली. या अपघातात त्या विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास वाठाेडा पाेलिस ठाण्याच्या हद्दीत झाला. भाग्यश्री जियालाल टेंभरे (वय 17 वर्षे, रा. माॅ अंबे काॅलाेनी, खरबी, वाठाेडा) असे अपघातात ठार झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.
 
Bhagyeshree Tembhre accident
 
 
भाग्यश्री ही बाराव्या वर्गाची विद्यार्थिनी असून ती मंगळवारी सकाळी साडेसात वाजता दुचाकीने ट्युशनला जात हाेती. गरीब नवाज चाैकाकडून खरबी चाैकाकडे जात असताना, बद्रीनाथ किराणा स्टाेअर्स जवळील सार्वजनिक राेडवर एका खाजगी बसच्या चालकाने बस भरधाव आणि निष्काळजीपणे चालवून भाग्यश्रीला धडक देऊन पळून गेला. या अपघातात भाग्यश्री गंभीर जखमी झाली. रस्त्यावरील नागरिकांनी लगेच भाग्यश्रीला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान भाग्यश्रीचा मृत्यू झाला. या प्ररकरणी वाठाेडा पाेलिसांनी आराेपी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. बसचालकाचा शाेध सुरु आहे.
 
अपघात सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद
गेल्या दाेन दिवसांत दाेन मुलींचा रस्ते अपघात झाल्याच्या घटना समाेर आल्या आहेत. भाग्यश्री टेंभरे हिला भरधाव बसने धडक दिल्याची घटना एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. ताे व्हिडिओ आज अनेकांच्या माेबाईलवर व्हायरल झाला. त्यामुळे या घटनेबाबत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
 
 
 

अपघातानंतर परिसरात तणाव
अपघात Bhagyeshree Tembhre accident  झाल्यानंतर संतप्त जमाव रस्त्यावर उतरला. बसचालकाला ताबडताेब अटक करण्याची मागणी केली. काही वेळातच रस्त्यावरील जमावाची संख्या वाढली. त्यामुळे वाठाेडा पाेलिसांनी लगेच परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. आराेपीविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याचा शाेध सुरु केल्यामुळे संभाव्य धाेका टळल्याची माहिती आहे.