अनिल कांबळे
नागपूर,
Operation Shakti गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभाग (एसएसबी)ने ऑपरेशन शक्ती अंतर्गत एका देहव्यापाराच्या अड्ड्यावर कारवाई केली. अड्डा चालविणाèया महिला व पुरूषाला अटक करून पीडित महिलेची सुटका केली. सुशीलकुमार लालसिंग ठाकूर (37) रा. चुनाभट्टी, विवेकानंदनगर आणि शाेभा श्याम शेंडे (45) रा. हनुमाननगर अशी अटकेतील आराेपींची नावे आहेत.
हुडकेश्वर ठाण्यांतर्गत नरसाळा मार्गावरील ब्रम्हविद्या साेसायटीमध्ये एका घरी देहव्यापाराचा अड्डा सुरु असल्याची माहिती हाेती. या माहितीच्या आधारावर पाेलिसांनी पंटरला ग्राहक बनवून तेथे पाठवले. पंटरने सुशील आणि शाेभा यांच्याशी साैदा करून पाेलिसांना इशारा दिला. पाेलिसांनी धाड टाकून झडती घेतली असता एक पीडित महिला मिळाली. आराेपींनी पैशांचे आमिष दाखवून तिला देहव्यापारात लाेटले हाेते. पाेलिसांनी पीडित महिलेला ताब्यात घेतले. शाेभा आणि सुशीलविरुद्ध हुडकेश्वर ठाण्यात पीटा अॅक्ट अन्वये गुन्हा नाेंदविण्यात आला. आराेपींकडून राेख 1,500 रुपये, 2 माेबाईल आणि वाहन असा एकूण 1 लाख रुपयांचा माल जप्त केला. ही कारवाई पाेलिस निरीक्षक राहुल शिरे, हवालदार प्रकाश माथनकर आणि त्यांच्या पथकाने केली.