45 दिवसांत चालान भरा , अन्यथा आरटीओ...

रस्ते वाहतूक मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

    दिनांक :08-Oct-2025
Total Views |
नवी दिल्ली,  
pay-challan-within-45-days केंद्र सरकारने वाहतूक आणि मोटर वाहन (MV) नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी नवीन नियमांचा मसुदा तयार केला आहे. या प्रस्तावित सुधारणा लागू झाल्यास, नियम मोडणाऱ्यांना ४५ दिवसांच्या आत चालान स्वीकारणे आणि दंड भरणे बंधनकारक होईल. तसे न केल्यास त्यांचे ड्रायव्हिंग लायसन्स (DL) आणि वाहन नोंदणी (RC) संबंधित सेवा थांबवल्या जातील.
 
pay-challan-within-45-days
 
मसुद्यानुसार, थकीत चालान भरणाऱ्यांचे प्रादेशिक परिवहन कार्यालये (RTOs) कोणतेही अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. तसेच, 'वाहन' (Vahan) आणि 'सारथी' (Sarathi) पोर्टलवर अशा वाहनधारकांना "नॉन-ट्रान्झॅक्टेबल" म्हणून चिन्हांकित केले जाईल, म्हणजे थकीत रक्कम भरली नाही तोपर्यंत त्यांना कोणत्याही आरटीओ सेवा घेता येणार नाहीत. pay-challan-within-45-days सुधारणांचा उद्देश नियम मोडणाऱ्यांना थकीत दंड त्वरित भरण्यास प्रोत्साहन देणे हा आहे. त्यामुळे वाहनचालकांना आता वाहतूक नियमांचे पालन करणे आणि वेळेत चालान भरणे बंधनकारक ठरेल.
मसुदा नियमांनुसार, चालान मिळाल्यावर संबंधित व्यक्ती पुराव्यासह ४५ दिवसांच्या आत पोर्टलवर ते आव्हानित करू शकते. प्राधिकरणाने ३० दिवसांत यावर निर्णय दिला नाही किंवा चालान रद्द केले नाही, तर दंडाची अंमलबजावणी होणार नाही. तज्ज्ञांनी सुचवले आहे की दंड भरल्यानंतर किंवा चालान रद्द झाल्यानंतर, संबंधित व्यक्तीचे नाव थकबाकीदार यादीतून त्वरित काढण्याची यंत्रणा स्पष्ट असावी. pay-challan-within-45-days प्राधिकरणाच्या निर्णयानंतर, ३० दिवसांत दंड भरणे किंवा दंडाच्या ५०% रकमेवर न्यायालयात आव्हान देणे शक्य असेल. या पावल्यांमुळे चालान भरण्याची वेळेत जबाबदारी सुनिश्चित होईल आणि थकीत रकमेचा डोंगर कमी होण्यास मदत होईल.