तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई

    दिनांक :08-Oct-2025
Total Views |
वाशीम,
tobacco sellers जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय वाशिम यांच्यावतीने तंबाखू नियंत्रण अंमलबजावणी पथकाकडून वाशीम शहरात कोटपा २००३ कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांवर धडक कारवाई करण्यात आली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अविनाश पुरी, तसेच पोलिस निरीक्षक देवेंद्रसिंग ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.
 

तंबाखू  
 
अकोला नाका, पाटणी चौक आणि राजस्थान महाविद्यालय रोड परिसरातील पानटपरी धारकांवर कलम ६(अ) व ६(ब) अंतर्गत कारवाई करत एकूण २ हजार ६०० दंड वसूल करण्यात आला. यावेळी नियमांचे उल्लंघन करणार्‍या पानटपरी धारकांना कठोर चेतावणी देण्यात आली. सदर मोहिमेत जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाचे जिल्हा सल्लागार डॉ. आदित्य पांढरकर, मानसशास्त्रज्ञ राम सरकटे, सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण धाडवे, तसेच मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, छत्रपती संभाजीनगर चे जिल्हा समन्वयक मंगेश गायकवाड यांनी सहभाग नोंदविला.tobacco sellers या कारवाईत हेकॉ. सुभाष राठोड, पोकॉ सुनील लठाड, प्रल्हाद तागड आणि गोटे यांनी सहकार्य केले. तंबाखू, गुटखा, सुगंधी पान मसाला यांसारख्या पदार्थांचा वापर केवळ आरोग्याचा नाश करतोच, पण मुखाच्या, फुफ्फुसांच्या आणि घशाच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारांना आमंत्रण देतो. स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे आरोग्य सुरक्षीत ठेवण्यासाठी तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहा. तंबाखूमुक्त वाशीम घडवूया ‡ हीच खरी सामाजिक जबाबदारी, असे आवाहन जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाकडून करण्यात आले आहे.