ठाणे,
police-acquits-accused-in-badlapur ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाचा मुख्य आरोपी अक्षय शिंदे पोलिसांच्या एनकाऊंटरमध्ये ठार झाला होता. एनकाऊंटरमध्ये आरोपीला ठार केलेल्या पोलिसांना निर्दोष ठरवण्यात आले आहे. या एनकाऊंटरबाबत वाद निर्माण झाले होते आणि आरोप केला जात होता की हा एन्काऊंटर फेक होता.
न्यायमूर्ती दिलीप भोसलें यांच्या न्यायालयीन आयोगाने पोलिसांना निर्दोषत्व बहाल केले आहे. पोलिसांनी दावा केला होता की स्वसंरक्षणासाठी त्यांनी अक्षय शिंदेंवर गोळीबार केला, आणि न्यायालयीन आयोगाने हा दावा मान्य केला आहे. आयोगाने मात्र आरोपीला व्हॅनमधून नेण्याच्या प्रक्रियेवर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. police-acquits-accused-in-badlapur पूर्वीच राज्य मानवाधिकार आयोगाने पोलिसांना क्लीनचिट दिलेली होती, कारण आरोपीच्या कुटुंबीयांची तक्रार नव्हती. न्यायालयीन आयोगाच्या क्लीनचिटमुळे पोलिसांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास एसआयटी मार्फत करण्यात आला होता. मुंबई उच्च न्यायालयाने जबाबदार पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते, परंतु गुन्हा वेळेत नोंदवला गेला नव्हता. यावर राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.