गावठी दारू अड्ड्यांवर छापा

१.६८ लाखांचा मुद्देमाल जप्त

    दिनांक :08-Oct-2025
Total Views |
वाशीम,
raid on liquor shop उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने गावठी हातभट्टी दारू विक्री करणार्‍या इसमांवर मोठी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल १ लाख ६८ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दारूबंदी कायद्याचे उल्लंघन करणार्‍या पाच आरोपींविरुद्ध मालेगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 

दारू भट्टी  
 
 
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, उपविभागीय पोलिस अधिकारी पथकाने डोंगरकिन्ही ता. मालेगाव या गावात वेगवेगळ्या पाच ठिकाणी छापे टाकले. या धाडीत काही इसम अवैधरित्या गावठी हातभट्टी दारू आणि मोहामाच सडवा बाळगताना व विक्री करताना आढळले. पोलिसांनी घटनास्थळावरून १०५ लिटर गावठी हातभट्टी दारू किंमत १०,५०० रुपये आणि ८५५ लिटर मोहामाच सडवा किंमत ८५,५०० रुपये जप्त केला. तसेच, १ मोबाईल आणि १ मोटारसायकल असा एकूण १,६८,५०० किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. गावठी हातभट्टी दारू बाळगणारे/विक्री करणारे आरोपी लक्ष्मण उत्तम गवई (वय ३६), प्रवीण सोपान गवई (वय ३५), मोहन विश्वनाथ गवई (वय ३८), हरचंद गोविंदा राठोड (वय ४०) आणि दादाराव विश्वनाथ गवई (वय ४०) (सर्व रा. डोंगरकिन्ही, ता. मालेगाव) यांच्याविरुद्ध मालेगाव पोलीस स्टेशन येथे अ.क्र. ४५३/२५ कलम ६५ (ई) (फ) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.raid on liquor shop सदरची महत्त्वपूर्ण कारवाई पोलिस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलिस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांनी केली.
या कारवाईत सपोनि दिनेश शिरेकार, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील पोहेकॉ. हरिभाऊ कालापाड, पोहेकॉ. अरविंद राठोड, पोकॉ. स्वप्नील शेळके, ड्रापोकॉ. अशोक कोकाटे, पोकॉ. संदीप मळघणे तसेच मालेगाव पोलिस स्टेशनचे पोहेकों किशोर चिंचोळकर, पोकों गजानन शिंदे हे कर्मचारी सहभागी झाले होते.