‘संघ गंगा के तीन भगीरथ’ या नाटकाचा सुवर्ण महोत्सवी प्रयोग

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १४ ऑक्टोबर रोजी प्रयोगाचे उद्घाटन

    दिनांक :08-Oct-2025
Total Views |
नागपूर,
Sangh Ganga ke Teen Bhagirath, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून संघाच्या तीन प्रथम सरसंघचालकांच्या कार्यावर आधारित द्विअंकी नाटक ‘संघ गंगा के भगीरथ’ या नाटकाचा सुवर्ण महोत्सवी प्रयोग येत्या मंगळवार, १४ ऑक्टोबर रोजी रात्री ७.३० रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी (सिद्धिविनायक मंदिराजवळ), मुंबई येथे सादर केला जाणार असल्याची माहिती राधिका क्रिएशन्सचे संचालक व नाटकाचे दिग्दर्शक संजय पेंडसे यांनी पत्रपरिषदेत दिली.
 
 

Sangh Ganga ke Teen Bhagirath, 
यावेळी पत्रपरिषदेत सारिका पेंडसे, अ‍ॅड रमण सेनाड, मीनल मुंडले यांची उपस्थिती होती. क्रिएशन्स, नागपूर-पुणे व ताराराणी क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष प्रयोगाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यासह महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सूचना तंत्रज्ञान व सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, तसेच राज्यमंत्री अ‍ॅड. आशिष जयस्वाल यांची विशेष उपस्थिती राहणार आहेत.या नाटकाचा ५१ प्रयोग १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता गडकरी रंगायतन, ठाणे येथे होणार आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक रवींद्र भुसारी या नाटकाचे मार्गदर्शक असून लेखक श्रीधर गाडगे आहेत. दिग्दर्शन संजय पेंडसे, नेपथ्य सतीश पेंडसे, संगीत डॉ. भाग्यश्री चिटणीस यांचे असून सूत्रधार राधिका देशपांडे आणि निर्मात्या सारिका पेंडसे आहेत तर रमण सेनाड, निलीमा बावणे, अरुणा पुरोहित यांचे निर्मिती सहाय्य लाभले आहे.
 
 
 
दोन अंकी नाटकामध्ये विविध प्रसंग
सुमारे Sangh Ganga ke Teen Bhagirath, २ तास २० मिनिटांचा कालावधी असलेल्या या दोन अंकी नाटकामध्ये डॉ. हेडगेवार यांचे बाल्यजीवन, वंदेमातरम प्रसंग, काँग्रेस अधिवेशनपूर्व स्थिती, संघ स्थापनेचा संकल्प, संघकार्य विस्तार, महात्मा गांधी व हेडगेवार भेट, श्री गुरुजी यांचे अखंडानंद व गुरुजी संवाद, डॉ. हेडगेवार यांचा अंतिम भाषण प्रसंग, गुरुजींचे सरसंघचालकपद, वल्लभभाई पटेल यांच्याशी संवाद, संघबंदी, काश्मीर विलिनीकरण, आपत्कालीन काळातील सत्याग्रह आणि रामजन्मभूमी आंदोलन आदी प्रसंग दर्शविण्यात आले आहेत.
 
 
१८८९ ते १९९६ या १०७ वर्षांच्या कालखंडात संघाच्या तीन महान सरसंघचालकांनी उभारलेले आदर्श नेतृत्व आणि राष्ट्रकार्य प्रेक्षकांसमोर करण्याचा हा असल्याची माहिती सारिका पेंडसे यांनी दिली. ‘संघ गंगा’ या नावाद्वारे संघकार्याच्या अखंड प्रवाहाचे प्रतीकात्मक दर्शन घडवणे आणि त्या प्रवाहाला दिशा देणार्‍या या तीन व्यक्तींना ‘भगीरथ’ म्हणून गौरवणे हा यामागील उद्देश आहे.
 
 
नाटकाचे १३७ प्रयोग यशस्वी
राधिका क्रिएशन्सने यापूर्वी २००६ मध्ये ‘इदं न मम’ या गोळवलकर गुरुजी यांच्या जीवनावर आधारित १३७ प्रयोग यशस्वीपणे केले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त त्यांनी ‘संघ गंगा के तीन भगीरथ’ हे नवे नाटक सादर केले असून, याचे प्रारंभिक प्रयोग ३० एप्रिल रोजी वनामती सभागृहात पार पडले आहेत. या नाट्यप्रयोगाचे संपूर्ण भारतभर १०० प्रयोग सादर करण्याचा संकल्प राधिका क्रिएशन्सने केला आहे.