संत परमहंस वासुदेवशास्त्री घाटे महाराजांचा अमृत महोत्सवी पुण्यतिथी उत्सव

    दिनांक :08-Oct-2025
Total Views |
आर्वी,
Sant Paramahans Vasudevshastri Ghate, संत परमहंस वासुदेवशास्त्री घाटे उपाख्य संत तात्याजी महाराज अमृत महोत्सवी पुण्यतिथी उत्सव रविवार १२ ते शनिवार १८ ऑटोबर रोजी श्रींचे मंदिर, महादेव वार्ड गांधी चौकाजवळ, आर्वी येथे आयोजित करण्यात आला आहे.
 

Sant Paramahans Vasudevshastri Ghate, Amrit Mahotsavi, Punyatithi Utsav, Arvi, Sant Tatyaji Maharaj, Shri Mandir, Mahadev Ward, Gandhi Chowka, Shri Bhagwat Path, Ganpati Vishnu Japa, Acharya Pandit Kalpesh Dave, Shirishdada Kavde Maharaj, Classical Singing, Prof. Dr. Jayshree Vaishnav, Adv. Milind Vaishnav, Prof. Dr. Narayan Nikam, Bhajan, Kirtan, Palakhi Procession, Dahi Handi, Warakari Chakribhajan, Sant Ganesh Maharaj, Sant Pandharinath Maharaj, Spiritual Festival Maharashtra 
रविवारी सकाळी ८.३० ते दैनिक पाठ संपेपर्यंत श्रीमद् भागवत मूळ पाठ संहिता वाचन-पारायण (अनुष्ठान), गणपती व विष्णूसहखनाम जपासह आचार्य पं. कल्पेश दवे व सहब्रह्मवृंद, १२ ते १८ दरम्यान सकाळी ९ ते १२.३० श्री कलश स्थापना, राधाकृष्ण अभिषेक, व्यासपीठ पूजन, श्रीमद् भागवत ग्रंथपूजन, ग्रंथदिंडी दुपारी ३ ते ५ श्रीमद् भागवत कथा प्रारंभ, दुपारी ३.३० ते ४.१५ सद्गुरू शिरीषदादा कवडे महाराज पुणे यांचे दर्शन, सायंकाळी ४.१५ ते ५ शिरीषदादा कवडे महाराज, पुणे यांचा श्रीमद् भागवतकथा कार्यक्रमात सहभाग, ५.३० ते ६.३० प्रा. डॉ. जयश्री वैष्णव व अ‍ॅड. मिलिंद वैष्णव यांचा शास्त्रीय गायनसेवा. ७ वाजता प्रवचन प्रा. डॉ. नारायण निकम, ७.३० वाजता शिरीषदादा कवडे महाराज यांचे प्रवचन, १३ रोजी सकाळी ९.३० ते १२.३० अभंग गायन, श्रीमद् भागवत कथा दुपारी ३ ते ७, दररोज श्रमद् भागवत कथा, आरती, प्रसाद, होईल.
१७ रोजी ११ ते १ श्रींच्या समाधीस रुद्राभिषेक, श्रीमद् भागवत कथा, आरती व प्रसाद, रात्री कीर्तन होईल. १८ रोजी भागवत कथा, अनुष्ठान व हवनासह समाप्ती, दुपारी १ ते ४ दरम्यान भजनी गोपालकाला होईल. यावेळी संत गणेश महाराज उत्तराधिकारी संत पंढरीनाथ महाराज, दगी जावरा चांदूर (रेल्वे), अमरावती हे राहतील. यावेळी प्रा. डॉ. नारायण निकम यांचे प्रबोधन, दुपारी श्रींच्या पालखीची मिरवणूक व दहीहांडी, सायंकाळी महाप्रसाद तर रात्री ९ ते ११ या वेळेत वारकरी चक्रीभजनाचा कार्यक्रम व समारोप होईल. या पुण्यतिथी महोत्सवाचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रा. डॉ. नारायण निकम यांनी केले आहे.