सहांपैकी दोन विजेते दारव्ह्याचे
तालुक्याचा अभिमान वाढवला
दारव्हा,
जिल्हास्तर Spelling Bee Competition स्पेलिंग बी स्पर्धेत दारव्हा तालुक्यातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करून तालुक्याचा झेंडा जिल्हास्तरावर फडकवला आहे. या स्पर्धेत एकूण ६ विजेते विद्यार्थी निवडल्या गेले असून त्यापैकी विजेते विद्यार्थी दारव्हा तालुक्यातील आहेत. वर्ग गट ४ ते ५ मध्ये हरू जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील आंचल भारत वानखडे हिने प्रथम पारितोषिक, तर वर्ग गट ६ ते ८ मध्ये भांडेगाव जिप प्राथमिक शाळेतील आर्यन मनोज राठोड याने तृतीय पारितोषिक पटकावले. या दोन्ही विद्यार्थ्यांचे तसेच त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आहे.
Spelling Bee Competition स्पर्धेची माहिती उशीरा मिळूनही शिक्षक व विद्यार्थ्यांनी दाखवलेला उत्साह, तयारी आणि मेहनत यामुळेच दारव्हा तालुक्याला हे यश प्राप्त झाले आहे. ‘देर से सही, लेकिन बाजी अपने दारव्हा की हुई है’ अशी भावना शिक्षकांमध्ये दिसून आली. सहभागी विद्यार्थी वर्ग गट ४ ते ५ : भाविक विठ्ठल मांगे, आतिश राजेश (रामगाव रे), राम सुरेश जाधव (खेड), मयुरी मोहन गवई (टाकळी बु). वर्ग गट ६ ते ८ : सुहानी अनिल जोगदंड (हरू), आयुष्का ललित कांबळे (घाटकिन्ही तांडा), मोहिनी माणिक जाधव (लाखखिंड), राशी अमोल सहारे (गावंडी).
दारव्ह्याची आणखी एक शैक्षणिक कामगिरी राज्यस्तरावर
Spelling Bee Competition दारव्हा तालुक्यातील जिप उच्च प्राथमिक मराठी घाटकिनी तांडा येथील विषय शिक्षक विशाल झाडे यांनी वर्गातील बॅकबेंचर्स विद्यार्थ्यांवर सकारात्मक परिणाम घडवणारा उपक्रम राबवला. या उपक्रमाची दखल विनोबा अॅप राज्यस्तर शैक्षणिक कथावली या मासिकाने घेतली आहे. यवतमाळ जिल्ह्यातून प्रथमच आणि दारव्हा तालुक्यातील पहिलीच कथा या राज्यस्तर मासिकात प्रसिद्ध झाल्याने संपूर्ण तालुका अभिमानाने उजळला आहे. सर्व विद्यार्थी, शिक्षक, तसेच पालकांचे अभिनंदन करण्यात आले. गटशिक्षणाधिकारी क्रांती खेडकर यांनीही सर्व संबंधितांचे अभिनंदन करताना म्हटले की, दारव्हा तालुक्यातील शिक्षकांचा उत्साह आणि विद्यार्थ्यांची जिद्द हीच आपल्या यशाची खरी गुरुकिल्ली आहे.