आर्वी,
Sumit Wankhede आपले काम प्रामाणिकपणे करणारे फारच कमी लोक असतात. ज्या कामासाठी आपली नियुती झाली आहे त्या कामाला न्याय देऊन समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली पाहिजे. असा ठसा आपल्या कार्यशैलीने निर्माण करण्याचा प्रयत्न श्यामसुंदर राठी यांनी केला आहे. त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. अशाच प्रामाणिकपणे कार्य करणार्या समाजसेवकांची समाजाला गरज आहे, असे प्रतिपादन आ. सुमित वानखेडे यांनी केले.
भारत सेवक समाज आर्वी व्दारा ज्येष्ठ समाजसेवक श्यामसुंदर राठी यांचा सत्कार करताना ते बोलत होते. यावेळी ऑल इंडिया शास्त्री सोशल फोरमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष इमरान राही, नपचे माजी अध्यक्ष डॉ. वसंत गुल्हाने, संस्थेचे सचिव जगन्नाथ बेलवे उपस्थित होते.श्यामसुंदर राठी यांनी आपली सामाजिक बांधिलकी समजून सामाजिक क्षेत्रात नेत्रदीप कामगिरी केली आहे. शालेय गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरणव ग्रामीण भागातील गरजूंना ब्लँकेट वितरण हे उपक्रम समाजाला दिलासा देणारे आहे, अशी भावना इमरान राही यांनी व्यत केली.
यावेळी श्यामसुंदर राठी यांचा संस्थेतर्फे गौरव करण्यात आला. श्यामसुंदर राठी यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये २१ हजार रुपयांचा धनादेश आ. सुमित वानखेडे यांच्याकडे सुपूर्द केला.प्रास्ताविक सचिव जगनन्नाथ बेलवे यांनी केले. संचालन नंदकिशोर दीक्षित यांनी तर आभार प्रेमराज पालीवाल यांनी मानले. कार्यक्रमाला अनिल जोशी, सुरेश चांडक, दिलीप खंडेलवाल, अॅड. मनोहर गुल्हाणे, आदी उपस्थित होते.