जिल्ह्यातील सहा नगरपरिषदांसाठी आरक्षण जाहीर

*आरक्षणानंतर ‘कही खुशी कही गम’ची स्थिती

    दिनांक :08-Oct-2025
Total Views |
वर्धा,
wardha-municipal-council : जिल्ह्यातील वर्धा, हिंगणघाट, आर्वी, पुलगाव, सिंदी रेल्वे आणि देवळी या सहा नगरपरिषदांमधील ८२ प्रभागातील १६६ सदस्यांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. वर्धा नगरपरिषदेतील २० प्रभागातील ४० नगरसेवकांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी ६ प्रभाग राखीव ठेवण्यात आले आहेत. यामध्ये तीन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. एसटी प्रवर्गासाठी दोन पैकी एक पुरुष आणि एक महिलेसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. ओबीसींसाठी ११ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यात ७ पुरुष आणि ४ महिलांचा समावेश आहे. खुल्या प्रवर्गातील २१ जागांपैकी ११ जागा पुरुष तर १० जागा महिलांसाठी राखीव आहेत.
 
 
 

jk l
 
 
 
 
वर्धा नगरपरिषदेत बुधवार ८ रोजी उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे, मुख्याधिकारी विजय देशमुख, उपमुख्याधिकारी अभिजीत मोटघरे आणि स्वीय सहाय्यक स्वप्नील खंदारे यांच्या उपस्थितीत आरक्षण जाहीर करण्यात आले. एससी प्रवर्गासाठी १५-अ, १७-अ आणि प्रभाग २० अ हे प्रभाग राखीव आहेत. एससी प्रवर्गातील महिलांसाठी ५-अ, १६-अ आणि प्रभाग १९-अ राखीव आहेत. एसटी प्रवर्गासाठी प्रभाग २-अ आणि १२-अ राखीव आहे. ११ प्रभाग ओबीसींसाठी राखीव आहेत. यामध्ये ७ पुरुष आणि ४ महिलांचा समावेश आहे. तसेच २१ जागा खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहेत. यामध्ये ११ पुरुष आणि १० महिलांसाठी आरक्षित आहे.
 
 
 
प्रभाग १ अ मध्ये नामाप्र, ब साठी सर्वसाधारण महिला, प्रभाग २ अ अनु. जमाती, ब- सर्वसाधारण महिला, प्रभाग ३ अ मध्ये नामाप्र, ब- सर्वसाधारण महिला, प्रभाग ४ अ नामाप्र महिला, ब - सर्वसाधारण, प्रभाग ५ अ मध्ये अनु. जाती महिला तर ब मध्ये सर्वसाधारण, प्रभाग ६ अ नामाप्र, ब- सर्वसाधारण महिला, प्रभाग ७ अ - नामाप्र, ब-सर्वसाधारण महिला, प्रभाग ८ अ- नामाप्र महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग ९ अ- नामाप्र महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग १० अ नामाप्र महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग ११ अ नामाप्र महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग १२ अ - अनु. जमाती महिला, ब- नामाप्र, प्रभाग १३ अ- नामाप्र, ब- सर्वसाधारण महिला, प्रभाग १४ अ सर्वसाधारण, ब - सर्वसाधारण महिला, प्रभाग १५ अ- अनु. जाती, ब- सर्वसाधारण महिला, प्रभाग १६ अ- अनु. जाती महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग १७ अ- अनु. जाती, ब- सर्वसाधारण महिला, प्रभाग १८ अ- नामाप्र महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग १९ अ- अनु. जाती महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग २० अ- अनु. जाती तर ब मध्ये सर्वसाधारण महिला आरक्षण काढण्यात आले आहे.