अनिल कांबळे
नागपूर,
Ganga Jamuna Vasti, गंगा-जमुना वस्तीत अल्पवयीनांसह युवतींकडून देहव्यवसाय करून घेणा-या दोन महिला दलालांना लकडगंज पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या कुंटनखान्याला पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या निर्देशानंतर सील लावण्यात आले आहे. दीपा , निलम उर्फ गुड्डी ( दोन्ही रा. बदनापूरा, मध्यप्रदेश, ह.मु गंगाजमुना वस्ती) या महिला दालाल उपरोक्त कुंटनखान्यात देहव्यवसायाकरिता अल्पवयीन मुली व युवती उपलब्धत करून देत होत्या.
गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने या कुंटनखान्यावर जुलै महिन्यात छापा टाकला होता. येथून पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीसह दोन युवतींची सुटका केली होती. कारवाईत पोलिसांनी आरोपी दीपा तसेच निलम या दोघींना ताब्यात घेतले होते. या दोघीही आर्थिकदृष्ट्या कमकुवत युवतींना अधीक पैशांचे आमिष दाखवून देहव्यवसायाच्या व्यवसायात ओढण्याचे काम करायच्या. शिवाय, त्यांना व्यवसायाकरिता ग्राहक आणि उपरोक्त ठिकाणी जागा उपलब्ध करून देत असल्याने पोलिसांनी कारवाईत दोन्ही आरोपी महिलांना ताब्यात घेतले होते. दरम्यान, लकगंज पोलिसांनी आरोपींना त्यांच्या जागेपासून निष्कासित करण्याबाबतचा प्रस्ताव पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्याकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावावर पोलिस आयुक्तांनी शिक्कामोर्तब केल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत चांदेवार यांच्या मार्गदर्शनात आणि सहायक पोलिस उपनिरीक्षक सुनील जाधव यांच्या नेतृत्वात वार्ड क्रमांक ३७, चिंतेश्वर मंदिर रोड, गंगा-जमुना वस्ती येथील तळ मजल्यावरील तील खोल्या सिलबंद केल्या