नागपूर,
NERI technology मानवी विष्ठेवर प्रक्रिया करून सेंद्रीय खत निर्मिती करण्याचे तंत्र वैज्ञानिक तथा औद्योगिक संशोधन परिषदेंतर्गत नागपुरातील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे. या तंत्रज्ञानातून पहिला प्रकल्प चंद्रपूरला कार्यान्वित झाला आहे. नीरीचे माजी संचालक व लिटूचे कुलगुरू डॉ. अतुल वैद्य, नीरीचे विद्यमान संचालक डॉ. एस. व्यंकट मोहन, प्रा. व्ही.ए. म्हैसाळकर, डॉ. पवन लाभसेटवार, डॉ. के.व्ही. जॉर्ज, चंद्रपूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील हे याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.नीरीचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. गिरीश पोफळी यांच्या नेेतृत्वात अभियंते नितीन नाईक व प्रवीण शेष, आर्यन वर्मा, डॉ. लावण्या अडागडा, हिमांशी तिवारी यांचा या प्रकल्पात समावेश आहे.
डॉ. गिरीश पोफळी यांनी सांगितले की, नीरीने (नागपूर) ‘मेकॅनिकल डीवॉटरिंग अँड ड्रायिंग सिस्टम’वर आधारित एक नवीन विष्ठा गाळ व सेप्टेज व्यवस्थापन संयंत्र विकसित व अमलात आणले आहे. एमडीडीएस तंत्रज्ञान नीरीने भारत-योरोपच्या होरायझन 2020 कार्यक्रमांतर्गत, स्वदेशीरित्या विकसित केलेआहे. यासाठी नीरी व भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाकडून ‘पवित्र’ प्रकल्पांतर्गत निधी दिला गेला.
घरांच्या सेप्टिक टँकमधून निर्माण होणारा विष्ठेचा गाळ सामान्यतः व्हॅक्यूम ट्रकद्वारे गोळा करून एसटीपीमध्ये टाकला जातो किंवा शहरांच्या बाहेरील भागात बेकायदेशीरपणे टाकला जातो. विष्ठेच्या गाळामध्ये घन पदार्थ असतात जे मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात उपचारितच असतात व एन, पी, के सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध असतात. तथापि, त्यात मोठ्या प्रमाणात रोगजनक किटाणुदेखील असतात, जे मानवी आरोग्यासाठी हानिकारक असतात.त्यानुसार, नीरीनेे एक प्रक्रिया प्रणाली विकसित केली आहे, जी द्रव भागाचे निर्जलीकरण व पिळून काढते, घन पदार्थ पुनर्प्राप्त करते. ज्यामध्ये रोगजनकांना कोरडे करून काढून टाकले जाते. ही एफएसएसएम सुविधा भारतातील अशा प्रकारची पहिलीच आहे, जी पोषक तत्वांनी समृद्ध व सेंद्रिय खत तयार करते. हे सेंद्रिय खत म्हणून पुनर्वापरासाठी कृषी मंत्रालयाच्या खत नियंत्रण आदेशाच्या (2013) नियमांचे पालन करते.
या नव्याने विकसित तंत्रज्ञानानुसार चंद्रपूर मनपाच्या डंपिंग यार्डात 65 लाख लिटर क्षमतेचा हा प्लांट कार्यान्वित करण्यात आला आहे