हिंगणघाट,
Adv. Sudhir Kothari हिंगणघाट शिक्षण संस्थेची सहधर्मदाय आयुतांच्या निर्देशानुसार आज ९ रोजी बाजार समितीच्या कापूस मार्केट येथील नवीन प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात निवडणूक पार पडली. चार जागांसाठी चारच उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने चारही उमेदवार अविरोध विजयी झाले. यात अध्यक्ष म्हणून अॅड. सुधीर कोठारी, कार्याध्यक्ष प्रा. दिनकर घोरपडे, सचिव नरेंद्र थोरात तर सहसचिव ओमप्रकाश डालिया यांची अविरोध निवड झाली. या निवडीची घोषणा सहाय्यक निवडणूक अधिकारी राजू माळोदे यांनी केली.
अॅड. सुधीर कोठारी यांनी या संस्थेच्या स्थापनेची पृष्ठभूमी सांगून संस्थेतील शाळांमध्ये शिस्तीचा अभाव आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना चांगले वळण लावण्यासाठी शिक्षकांनी परिश्रम घेण्याचे आवाहन केले. माजी संस्था अध्यक्षांनी स्वतःच्या मुलांची बाबू म्हणून नियुती करून पदाचा गैरवापर केला आहे. यापुढे संस्थेचे संचालक या संस्थेचा गैरफायदा स्वतःच्या हितासाठी घेणार नाही याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तसेच संस्थेच्या आजवरच्या व्यवहाराची निष्पक्षपणे चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. या संस्थेच्या तिन्ही शाळा ग्रामीण भागात असून आजच्या स्पर्धेच्या युगात शेतकरी-शेतमजुरांचे पाल्य शिक्षणातून उच्च पदावर पोहोचावे यासाठी पाल्यांना दर्जेदार शिक्षण या शाळांमधून देण्याचा आम्ही प्रयत्न करू, असे जाहीर केले. यावेळी नवनियुत कार्याध्यक्ष प्रा. दिनकर घोरपडे, पत्रकार सतीश वखरे यांनी आपले मनोगत व्यत केले. संचालन दीपक माडे तर आभार नरेंद्र थोरात यांनी मानले.
निवडीबद्दल माजी आमदार राजू तिमांडे, समुद्रपूर बाजार समितीचे अध्यक्ष हिम्मत चतुर, उपसभापती हरीष वडतकर, मधुकर डंभारे, उत्तम भोयर, कामगार नेते आफताब खान, डॉ. निर्मेश कोठारी, रामदास निभ्रड, दिगांबर चांभारे, मधुसूदन हरणे, डॉ. निर्मेश कोठारी, राजू मंगेकर, प्रफुल्ल बाडे, घनश्याम येरलेकर, अशोक उपासे, संजय कातरे, पंकज कोचर, माधुरी चंदनखेडे, नंदा चांभारे, हर्षद महाजन, महादेव बादले, आदींनी अभिनंदन केले.