नागपूर,
Ambedkar College डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात "अभिजात मराठी भाषा सप्ताह" मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. विकास सिडाम होते, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. सतीश कर्पे यांची उपस्थिती होती.
प्रा. कर्पे यांनी मराठी साहित्यातील संत-महंतांच्या योगदानावर प्रकाश टाकत मराठी भाषा समृद्ध करणाऱ्या लेखकांचे महत्त्व अधोरेखित केले.Ambedkar College अध्यक्षीय भाषणात प्रा. सिडाम यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा घेऊन लेखन क्षेत्रात योगदान देण्याचे आवाहन केले.कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी स्वलिखित कविता आणि भाषण सादर करून मराठी भाषेप्रती आपले प्रेम व्यक्त केले. सूत्रसंचालन, प्रास्ताविक व आभार प्रदर्शन लकी पिंपळकर हिने केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक व विद्यार्थी वर्गाने मोठे योगदान दिले. या उपक्रमासाठी प्राचार्या डॉ. दीपा पान्हेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
सौजन्य:प्रफुल ब्राम्हणे ,संपर्क मित्र