आनंदाच्या शिधा यावर्षी लाडकी बहीण योजनेने हिरावल्याचे सुर

सणातही अल्प दरातील शिधेपासून नागरिक मुकणार

    दिनांक :09-Oct-2025
Total Views |
मानोरा,
ladki bahin scheme तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना रास्त भाव दुकानातून शासनाच्या वतीने नाममात्र दरात दिल्या जात असलेल्या आनंदाची शिधा योजनेवर लाडकी बहीण योजना भारी पडल्याने आनंदाच्या शिधा गणेशोत्सव, दसर्‍यानंतर येणार्‍या दिवाळी सणात सुद्धा मिळणार नसल्याचे अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून दिवाळी सण तोंडावर येऊनही यासंदर्भात कुठल्याच हालचाली होत नसल्याने जाणवत आहे.
 
 

आनंदाचा शिधा  
 
 
सण गोड करण्यासाठी एक किलो साखर, चणाडाळ, रवा व खाद्यतेल ही किट केवळ शंभर रुपयांमध्ये रास्त भाव दुकानातून शासनामार्फत मागील वर्षी वितरित करण्यात आली होती.सप्टेंबर महिन्यात विशेषता मराठवाडा विदर्भ आणि राज्यातील उर्वरित भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांसह मजूर वर्ग सुद्धा आर्थिक अडचणीतून मार्गक्रमण करत असताना यंदाच्या किमान दिवाळीला तरी आनंदाच्या शिधाची किट शासनाकडून मिळून दीपोत्सव आनंदात साजरा करता येईल या आशेवर पाणी फिरल्यात जमा असल्याचे बोलले जात आहे. दीपावली बोटावर मोजण्या एवढ्या दिवसावर येऊन ठेपलेली असतानाही प्रशासनाकडून आनंदाच्या शिधा संदर्भात कुठलेच संकेत मिळत नसल्याने उपरोक्त वर्गाच्या आनंदावर विरजण पडल्याचे बोलले जात आहे.ladki bahin schemeआनंदाची शिधा ही यापूर्वीच्या दोन वर्षातील सण उत्सवात नागरिकांना वितरित करण्यात आली.निवडणुकीचे वर्ष असल्याने गतवर्षी राज्यात लाडकी बहीण योजनेसह इतरही असंख्य लोककल्याणकारी योजना शासनाकडून राबविण्यात आल्याने मोठा आर्थिक ताण राज्याच्या राजकोषावर पडत असल्याच्या चर्चा आहेत.
लाडकी बहीण योजनेचा सरळ फटका या वर्षी आनंदाच्या शिधा योजनेला बसून या शिधेपासून गरजू व गरीब सर्वसामान्य नागरिक वंचित राहत असल्यामुळे दीपोत्सवातील आनंदावर काही प्रमाणात विरजन पडणार असल्याचे बोलले जात आहे.