चंद्रपूर,
atm-vehicle-theft-case : पांधरकवडा येथील बँक ऑफ महराष्ट्रचे एटीएम यंत्र कटरने कापून त्यातील 10 लाख 92 हजार 800 रुपये लंपास करणार्या एका आरोपीला घग्घूस पोलिसांनी राजस्थान येथून अटक केली होती. या प्रकरणातील इतर आरोपींच्या शोधात असताना या गुन्ह्यात वापरलेले बोलेरो चारचाकी वाहन हरियाणा राज्यातील दिनगुहा येथून पोलिसांनी जप्त केले आहे.
पोलिसांनी या प्रकरणात आरोपी जिल्ली सिरदार खान (52) यास तेलंगणा राज्यातील चिन्नुर येथून अटक केली होती. अन्य तीन फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी एक पथक राजस्थान राज्यात रवाना झाले. तपासादरम्यान पोलिसांना आरोपी नागे साजीद जोम खान (रा. दिनगुहा, राज्य हरीयाणा) याची माहिती काढली असता गुन्हयात वापरलेले वाहन त्याच्या घरासमोर उभे असल्याचा सुगावा लागला. पोलिस त्या ठिकाणी पोहचले. मात्र आरोपी सापडला नाही. पोलिसांनी आरोपीच्या घरासमोरील गुन्ह्यात वापरलेले बोलेरो वाहन (एचआर 93 डी 9860्र) ताब्यात घेतले. ते वाहन आरोपी साजीद जोम खान याच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले आहे. पुढील तपास घुग्घूस पोलिस करीत आहे.
ही कारवाई पोलिस अधिक्षक, अप्पर पोलिस अधिक्षक, उप विभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रकाश राउत, सहायक पोलिस निरीक्षक सचीन तायवाडे, प्रफुल डाहुले, हवालदार विशाल हुड, नितीन मराठे, प्रसन्नजित डोर्लीकर, रवी वाभीटकर, पवन डाखरे यांनी केली.