वृंदावन
Elvish Yadav अध्यात्मिक क्षेत्रातील ख्यातनाम संत पूज्य प्रेमानंद जी महाराज सध्या त्यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव चर्चेत आहेत. त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक भक्त त्यांची भेट घेण्यासाठी वृंदावनात दाखल होत आहेत. या भक्तांमध्ये आता यूट्यूबर आणि ‘बिग बॉस ओटीटी २’चा विजेता एल्विश यादव याचेही नाव जोडले गेले आहे. सोशल मीडियावर दोघांची भेट आणि संवादाचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
या भेटीत एल्विश यादव यांनी प्रेमानंद महाराजांची प्रकृती विचारली. महाराजांनी अत्यंत शांतपणे आणि समाधानी भावनेने उत्तर देताना सांगितले, “माझ्या दोन्ही किडन्या आता काम करत नाहीत. पण ईश्वराच्या कृपेने मी अजूनही तुमच्याशी बोलू शकतो, भेटू शकतो. आता काहीही सुधारण्याची गरज नाही. आज असो वा उद्या, आपण सर्वांना एक दिवस या जगातून निघून जावेच लागणार आहे.”
महाराजांच्या Elvish Yadav या उत्तराने एल्विश यादव भावुक झाले. संवादाच्या ओघात प्रेमानंद महाराजांनी एल्विशला विचारले की, “तू नामजप करतोस का?” त्यावर एल्विशने प्रांजळपणे “नाही” असे उत्तर दिले. यावर महाराजांनी प्रेमळतेने त्याला मार्गदर्शन करत सांगितले की, “तू आज ज्या यशाच्या शिखरावर आहेस, ते तुझ्या मागील जन्माच्या पुण्यामुळे आहे. पण आत्ताचा पुण्यसंचय काय? रोज थोडा का होईना, भगवंताचं नाम घे. ‘राधा’ या नावाचा रोज दहा हजार वेळा जप कर. एका अंगठीत माळ घाल आणि हे साध्य कर. हे तुझं काहीही वाईट करणार नाही.”या सल्ल्याला प्रतिसाद देत एल्विश यादव यांनी विनम्रपणे होकार दिला आणि दररोज ‘राधा’ नामाचा दहा हजार वेळा जप करण्याचा संकल्प घेतला. या निर्णयामुळे अनेक भक्तांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर एल्विशचे कौतुक केले आहे.मुलाखतीदरम्यान महाराजांनी एल्विशला आणखी एक महत्त्वाचा सल्ला दिला. “जर तू हातात दारू घेऊन लोकांसमोर दिसलास, तर लाखो लोक तुझ्याकडून तेच शिकतील. पण जर तू ‘राधा’ नाम जपत राहिलास, तर तुझा प्रभाव सकारात्मक असेल. लोक तुझ्याकडे पाहून सत्कर्म करतील.”
प्रेमानंद महाराजांनी Elvish Yadav प्रकृती अस्वास्थ्यामुळे सध्या आपली पदयात्रा काही काळासाठी स्थगित केली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांचे भक्त त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. एल्विश यादव यांच्यासारख्या तरुण व्यक्तींचा अध्यात्माकडे वाढता कल पाहता, ही भेट अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.