अतिवृष्टी बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही

*पालकमंत्री डॉ. भोयर यांची पत्रकार परिषदेत माहिती

    दिनांक :09-Oct-2025
Total Views |
वर्धा,
Pankaj Bhoyar : अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या पाठीशी राज्य सरकार भरक्कमपणे उभे आहे. राज्याच्या इतिहासात प्रथमच शासनाने एवढ्या मोठ्या प्रमाणात मदत जाहीर केली. जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दिवाळीपुर्वी आर्थिक मदत देण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे. या मदतीपासून जिल्ह्यातील एकही शेतकरी वंचित राहणार नाही असे सांगुन जिल्ह्यात पंचनामे झाले नसल्याची तक्रार प्राप्त झाल्यास कारवाई केली जाईल अशी माहिती पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिली.
 
 
BHOYAR
 
स्थानिक विश्रामगृह येथे आज ९ रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी खासदार रामदास तडस, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय गाते. आ. दादाराव केचे, आ. राजेश बकाणे व शिवसेनेचे जिल्हा प्रमु राजेश सराफ उपस्थित होते. पालकमंत्री डॉ. भोयर पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकर्‍यांच्या मदतीसाठी ३१६२३ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. राज्यात प्रथमच बाधितांना एवढी मोठी मदत दिली आहे.
 
 
या मदतीमधून अतिवृष्टी दरम्यान मृत्युमुखी पडलेल्या व्यतीच्या परिवाराला ४ लाख रुपये मदत दिली जाणार आहे. जखमीला ७४ हजार ते अडीच लाख, अंशत: पडझडसाठी ६५०० रुपये, झोपड्यांसाठी ८ हजार, दुधाळ जनवारांसाठी ३७ हजार ५०० रुपये अशी मदत दिल्या जाणार आहे. यासाठी १० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शेत खरडून गेलेल्या शेतकर्‍यांसाठी ४७ हजार रुपये प्रति हेटर तसेच मनेरेगा अंतर्गत ३ लाख रुपये प्रति हेटर मदत, खचलेली अथवा बाधित विहिरीसाठी ३० हजार रुपये तातडीची मदत दिल्या जाणार आहे. अतिवृष्टीमुळे बाधित गावांना विविध सवलती दिल्या जाणार आहे. यामध्ये जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुर्नगठन, शेती कर्ज वसुलीला स्थगिती, शाळा व कॉलेजच्या परीक्षा शुल्कात माफी, शेत पंपाची जोडणी खंडीत न करणे आदीचा समावेश असल्याचे ना. भोयर यांनी सांगितले.
 
 
वधार् जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे १ लाख ४९ हजार ५४६ शेतकर्‍यांचे १ लाख ६७ हजार ४७६. ९६ हेटर शेतीचे नुकसान झाले. त्यासाठी १४२ कोटी रुपये तर सोयाबीनवर आलेल्या रोगाची नुकसान भरपाई म्हणून ३९ कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आला असुन मे महिन्यात झालेल्या नुकसानीचे १० कोटी रुपयांचे वाटप झाले असल्याचे ना. भोयर यांनी सांगितले.