ओला दुष्काळ जाहीर करुन कर्जमाफी द्या

शिवसेना (उबाठा) ची तहसील कार्यालयावर धडक

    दिनांक :09-Oct-2025
Total Views |
कारंजा लाड,
farmers loan waiver तालुक्यातील शेतकर्‍यांवर ओल्या दुष्काळाचे संकट कोसळले असून, मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांना आर्थिक दिलासा मिळावा, ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करावा व प्रति हेटर ५० हजार रुपयांची मदत तसेच संपूर्ण कर्जमाफी लागू करावी, या प्रमुख मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने ८ ऑटोबर रोजी कारंजा तहसील कार्यालयावर धडक देऊन तहसीलदाराना निवेदन दिले.
 
 

farmer  
 
 
शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना मदत दिली पाहिजे. शेतकर्‍यांचे उत्पन्न कोसळले असून, कर्जाचा डोंगर वाढत आहे. म्हणूनच संपूर्ण कर्जमाफी ही काळाची गरज असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच निवेदनात ओला दुष्काळ जाहीर करून संपूर्ण कर्जमाफी लागू करावी, नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तत्काळ आर्थिक मदत द्यावी, विमा कंपन्यांनी थकीत भरपाई त्वरित द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्यात. दरम्यान, आंदोलनानंतर रेस्ट हाऊस, कारंजा येथे पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आगामी आंदोलनाचा आराखडा व पुढील कार्ययोजना ठरविण्यात आली तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व इतर ज्वलंत प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.farmers loan waiver शेतकर्‍यांच्या हक्कांसाठी लढा देणे हेच आपले कर्तव्य असल्याचे सांगून सुरळकर यांनी शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांनी सजग रहावे, असे आवाहन केले. निवेदन देते वेळी तालुकाध्यक्ष विलास पाटील सुरळकर यांच्यासह गणेश बाबरे, प्रिया महाजन, विलास कडू, महेश बांबल, उगले पाटील यांच्यासह अनेक शेतकरी व पक्ष कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.