लाडक्या बहिणींसाठी आनंदवार्ता...सप्टेंबर हप्त्याचे वाटप लवकरच

    दिनांक :09-Oct-2025
Total Views |
मुंबई,
Good news for ladali bahin मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सप्टेंबर महिन्याचे हप्ते लवकरच लाभार्थी महिलांना मिळण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने या महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी आवश्यक ती तयारी सुरू केली असून, सामाजिक न्याय विभागाकडून महिला व बालविकास विभागाला ४१० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामुळे लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचे हप्ते लवकरच मिळू शकतील, असा अंदाज आहे.
 
 
 
Good news for ladali bahin
महाराष्ट्र सरकारने जुलै २०२४ मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. त्या काळापासून आतापर्यंत, जुलै २०२४ ते ऑगस्ट २०२५ पर्यंत, १४ हप्त्यांची रक्कम लाडक्या बहिणींना मिळाली आहे. ऑगस्ट महिन्याचे हप्ते सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीस दिले गेले होते, Good news for ladali bahin तर आता सप्टेंबर महिन्याचे हप्ते वितरणासाठी सामाजिक न्याय विभागाकडून आवश्यक निधी वर्ग केला गेला आहे. योजनेसाठी एक महत्त्वाचा निकष आहे की, लाभार्थी महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असावे. सरकार या निकषाची पडताळणी करण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया राबवत आहे. यामध्ये लाभार्थींनी त्यांच्या आधार कार्डची पडताळणी करणे अनिवार्य आहे, तसेच पती किंवा वडिलांच्या आधार क्रमांकाची देखील खात्री करावी लागेल. महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी सर्व लाभार्थी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया दोन महिन्यांच्या आत पूर्ण करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे.
 
योजनेच्या निकषांची पूर्तता न करणाऱ्या महिलांना लाभार्थी यादीतून वगळले जाईल. काही दिवसांपूर्वी एकाच कुटुंबातील तीन महिलांनी लाभ घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर गृहभेटी आणि चौकशीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेतून लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे.