ग्रापं सदस्यांचे दोन वर्षांचे मानधन जमा

सरपंच संघटनेच्या मागणीला यश

    दिनांक :09-Oct-2025
Total Views |
समुद्रपूर,
gram panchayat मागील काही वर्षांपासून गाव विकासाची धुरा सांभाळणार्‍या ग्रामपंचायत सदस्यांचे मानधन रखडले होते. सरपंच संघटनेच्या वतीने पाठपुरावा करण्यात आला होता. अखेर या पाठपुराव्याला यश आले असून २ वर्षांचे ग्रामपंचायत सदस्यांचे मानधन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे ग्रामपंचायत सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 

gram panchayat honorarium released, Maharashtra village development, grampanchayat members payment, sarpanch sanghatana success, delayed honorarium cleared, 2 years grampanchayat dues, rural governance Maharashtra, Samudrapur news, panchayat samiti honorarium, online honorarium disbursement, government honorarium update, rural body members payment, Maharashtra gram vikas news, panchayat development funds, grampanchayat salary issue, village council payment, sarpanch members demand fulfilled, Maharashtra rur 
सरपंच, उपसरपंचांचे मानधन ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या खात्यात अधुनमधून जमा केले जाते. मात्र, त्यांना विकासासाठी सहकार्य करणार्‍या ग्रामपंचायत सदस्यांना शासनाकडून २०० रुपये प्रमाणे मासिक भत्त्याच्या स्वरूपात मानधन दिले जाते. तेही वेळेवर दिले जात नसल्याने ग्रापं सदस्यांनी नाराजी व्यत केली होती. गेल्या तीन वर्षापासून ग्रामपंचायत सदस्यांचे मानधन मिळाले नव्हते. याची दखल सरपंच संघटनेच्या वतीने घेऊन वेळोवेळी ग्रामविकास मंत्रालयाकडे पाठपुरावा केला. शेवटी या पाठपुराव्याला यश मिळाले असून पंचायत समितीमध्ये मानधन जमा झाले आहे. पंचायत समितीच्या वतीने ग्रापंला मानधन वितरण करण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे ग्रापं सदस्यांनी पंचायत समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन सरपंच संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.