तळेगाव (श्या.पंत) येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन उद्या

* आ. वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती

    दिनांक :09-Oct-2025
Total Views |
तळेगाव (श्या.पंत), 
Sumit Wankhede : आ. सुमित वानखेडे यांचया पुढाकारातून मंजूर झालेल्या विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण उद्या १० रोजी आयोजित करण्यात आला आहे. अध्यक्षस्थानी दादाराव केचे राहतील तर आ. सुमित वानखेडे यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण होईल. प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती रेखा मतले, जिल्हा परिषदचे माजी सदस्य छाया घोडिले, जिपचे माजी सदस्य अंकिता होले, हेमलता भगत, गोविंदा खंडाळे, आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्यांची उपस्थिती राहणार आहे.
 
 
 
SUMIT
 
 
 
सकाळी ९ ते ११ विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण, सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत आमदार आपल्या दारी तसेच दुपारी २ वाजता भाजपा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन होईल तर कार्यक्रमाचा समारोप कार्यक्रम ६ वाजून १५ मिनिटांनी चिस्तुर येथे होईल. जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपा आष्टी तालुयाच्या वतीने करण्यात आले आहे.