नागपूर,
divisional-office : एसटी कामगारांच्या प्रलंबित मागण्या सोडवणुकीकारिता महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने १४ ऑक्टोबर पासून नागपूर विभागीय कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मध्यवर्ती कार्यालय मुंबई येथे १३ ऑक्टोबर पासून धरणे आंदोलन केल्या जाणार आहे. संयुक्त कृती समितीच्या वतीने विभाग नियंत्रक विनोद आणि प्रादेशिक व्यवस्थापक श्रीकांत गभने यांना आपल्या मागणीचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी एस.टी. कामगार संघटनेचे अजय हट्टेवार, यामिनी कोंगे, विनोद धाबर्डे, संग्राम जाधव, मुन्ना मेश्राम, सुधाकर गजभिये, प्रशांत बोकडे आदी उपस्थित होते.