अनिल कांबळे
नागपूर,
Kalamna market theft शहरात वाहन चाेरी सक्रिय चाेरट्याच्या पाेलिसांनी मुसक्या बांधल्या. या चाेरट्याने काहीच दिवसांपूर्वी कळमण्यातील भाजी मार्केट परिसरातून एक दुचाकी चाेरी केली हाेती. पाेलिसांच्या तपासात हा चाेरटा हाती लागला. चाैकशीत त्याने शहरातून तब्बल 11 वाहन चाेरी केल्याचे उघडकीस आले. पाेलिसांनी ही सर्व वाहने जप्त करीत आराेला अटक केली. देवेश देवेंद्र सनाेडिया (20, सुंदरनगर, भांडेवाडी) असे आराेपीचे नाव आहे.
आराेपीने मागील 25 सप्टेंबला कळमना भाजी मार्केटमध्ये ठेवलेली विनय सुखदेव दुपारे (42, जिंजर माॅलजवळ, जरीपटका) यांची दुचाकी चाेरून नेली हाेती. या प्रकरणी प्राप्त तक्रारीवरून पाेलिसांनी आराेपीविरूद्ध गुन्हा दाखल केला हाेता. सतत कळमना मार्केट पसिरातून वाहन चाेरी हाेत असल्याने ठाणेदार प्रवीण काळे यांनी आराेपीचा आलेख तयार केला. यानंतर पाेलिस या परिसरात लक्ष ठेवून हाेते. मागील तीन दिवसांपूर्वी आराेपी देवेंद्र हा मार्केटमध्ये वाहन चाेरीसाठी आला असता पाेलिसांनी त्याला ताब्यात घेतले. ठाण्यात आणून त्याची सखाेल चाैकशी केली असता त्याने मार्केट परिसरातून एकूण 11 वाहने चाेरी केल्याची कबुली दिली. या प्रकरणी पाेलिसांनी आराेपीच्या ताब्यातून सर्व चाेरीचे वाहन जप्त करीत आराेपीला अटक केली.