कर्मण्नेयमध्ये दांडिया सोहळा साजरा

    दिनांक :09-Oct-2025
Total Views |
नागपूर,
Karmannay School बुटीबोरी येथील कर्मण्नेय स्कूल ऑफ एक्सिलेन्समध्ये चार दिवसांचा सांस्कृतिक महोत्सव साजरा करण्यात आला. . या कार्यक्रमात “विविधतेतील ऐक्य”, “दांडिया” आणि “बॉलीवूड” या संकल्पनांचा सुंदर संगम पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि हितचिंतकांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला.
 
 
dipti
 
 चौथ्या दिवशी झालेल्या दांडिया आणि जागरणाने संपूर्ण वातावरण भक्तीमय अनुभवाने भारावून टाकले. विविध स्पर्धांमधील विजेत्यांचा सत्कार अध्यक्षा प्रतिभा घाटे आणि संचालिका प्रीती कानेटकर यांच्या हस्ते करण्यात आला. Karmannay School कार्यक्रमाचे परीक्षण प्रख्यात नृत्यकलावंतांनी केले, मुख्याध्यापिका डॉ. उन्नती दातार यांनी सर्व कर्मण्नेय परिवाराच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि स्मिता बाकडे, वैष्णवी मिश्रा, चेतन वानखेडे, नमिता द्विवेदी आणि शिक्षकवर्गाच्या योगदानाचे विशेष अभिनंदन केले.
सौजन्य:डॉ. उन्नती दातार,संपर्क मित्र