छत्तीसगड,
Kawardha accident छत्तीसगडमधील कवर्धा येथे एका हृदयद्रावक घटनेने सर्वांची हृदय हादरवून टाकली आहेत. एका वडिलांनी त्यांच्या मृत मुलीचा वाढदिवस तिच्या अंत्यसंस्काराच्या दिवशीच साजरा केला, हा दृश्य पाहणाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणणारा ठरला. रविवारी संध्याकाळी (५ ऑक्टोबर) कवर्धा जिल्ह्यातील चिल्फीजवळ कोलकाता येथील एका कुटुंबाची कार ट्रकला धडकली. ही कार कान्हा राष्ट्रीय उद्यानातून परतताना मार्गावर होती. अपघात इतका भीषण होता की पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, त्यात लहान मुलगी आदित्री आणि तिची आईही समाविष्ट होत्या.
८ ऑक्टोबर रोजी कवर्धा येथे आदित्री आणि तिच्या आईवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराच्या वेळी वडिलांनी त्यांच्या मुलीचा वाढदिवस असल्याचे सांगितले आणि तो क्षण पाहणाऱ्यांना स्तब्ध करून टाकणारा होता. वडिलांच्या दुःखाला सामोरे जाताना उपस्थितांनी त्या क्षणाला आदित्रीचा शेवटचा वाढदिवस साजरा केला. त्यांनी फुग्यांनी सजावट केली, केक कापला आणि वाढदिवसाची टोपी घालून आदित्रीचा फोटो सजवला.