मधुबन लेआउट येथे मेहंदी महोत्सव यशस्वी

    दिनांक :09-Oct-2025
Total Views |
नागपूर,
Mehndi Festival महालक्ष्मी मंदिर, मधुबन लेआउट येथे आसावरी कोठीवान यांच्या आयोजनेत "मेहंदी महोत्सव" पार पडला. या कार्यक्रमाला सर्व माता-भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला आणि १२८ हातांवर मेहंदी लावण्यात आली.
 
mendhi
 
कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी महिला आघाडी मंडळाचे पालक मंजुषा भुरे, अध्यक्ष अंजली देशपांडे, महामंत्री सुमीत्रा सालवटकर व स्वाती फडणवीस यांनी भेट दिली. Mehndi Festival मंदिर सभागृहाचे अध्यक्ष शरदचंद्र लांबे यांनी कार्यक्रमासाठी सभागृह उपलब्ध करून दिले.शुभांगी कामडी, कविता बोबडे, प्रज्ञा जोशी, राजश्री डुम्मनवार, रंजना धकिते यांनी कार्यक्रमाला पूर्ण वेळ उपस्थिती दर्शवून यशस्वितेत हातभार लावला.
सौजन्य:आसावरी कोठीवान ,संपर्क मित्र