सावली,
Mokhala farmer suicide, तालुक्यातील मोखाळा येथील शेतकर्याने घरी कुणी नसल्याची संधी हेरून गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना गुरूवार, 9 ऑक्टोबर रोजी सकाळी सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली. रेमाजी देशमुख (55) असे मृतक शेतकर्याचे नाव आहे.
रेमाजी देशमुख यांची पत्नी कांताबाई ही गुरूवारी सकाळी दही विकण्यासाठी गडचिरोली येथे गेली होती. तर मुलगा व सून वाशीम जिल्ह्यात सोयाबीन काढण्यासाठी बुधवारीच गेले होते. घरात लहान नातवंड होती. दरम्यान, रेमाजी यांनी घरात गळफास लावून आत्महत्या केली. पत्नी कांताबाई ही दही विकुन घरी परत आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती स्थानिक पोलिस पाटील यांना दिली. माहिती कळताच पोलिस ठाण्याचे ठाणेदार पुलूरवार यांनी आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात रवाना केला. पुढील तपास सावली पोलिस करीत आहेत. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.