महावितरण म्हणते अत्यल्प प्रतिसाद

-पर्यायी व्यवस्था

    दिनांक :09-Oct-2025
Total Views |
नागपूर,
Mahavitaran : वीज कर्मचाऱ्यांच्या 29 पैकी 7 संघटनांच्या संयुक्त कृती समितीने पुकारलेला हा 72 तासांचा संप बेकायदेशीर असल्याचे जाहीर करत संपात 62 टक्केही अभियंते, अधिकारी कर्मचारी सहभागी झाले नाहीत, असे महावितरणने स्पष्ट केले आहे. महावितरणने ‘महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षक अधिनियम’ म्हणजेच ‘मेस्मा’ लागू केला आहे.
 
 
 
MAHAVITARAN
 
 
 
महावितरणने आपत्कालीन पर्यायी व्यवस्था केली आहे. महावितरणने गुरूवारी 9 ऑक्टोबरला सुमारे 62 टक्के उपस्थिती असल्याचे म्हटले आहे. 20 हजार तांत्रिक बाह्यस्त्रोत कर्मचारी (यंत्रचालक व विद्युत सहायक) कार्यरत आहेत.
 
 
संपात सहभागी नसलेले महावितरणचे कर्मचारी, 20 हजार बाह्य स्त्रोत तांत्रिक कर्मचारी, महावितरणच्या निवड सूचीवरील कंत्राटदार व कर्मचाèयांची सुरळीत वीज पुरवठ्यासाठी स्थानिक कार्यालय, उपकेंद्रांवर तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे.
 
 
सुरळीत वीज पुरवठ्यासाठी सर्व क्षेत्रीय, विभाग कार्यालयांच्या निवडसूचीवर असलेल्या सर्व कंत्राटदारांना आवश्यक साधनसामुग्री, मनुष्यबळ व वाहनांसह संबंधित कार्यालयांमध्ये उपलब्ध झाले आहेत. वीज पुरवठा संदर्भात तक्रारी असल्यास मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे 1912 किंवा 1800-212-3435 किंवा 1800-233-3435 या 24 तास टोल फ्री क्रमांकावर साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.