अनिल कांबळे
नागपूर,
20 lakh theft Vasantnagar मध्यरात्रीपर्यंत वर्दळ असलेल्या वसंतनगर परिसरातील एका घरात शिरून चाेरट्यांनी अंदाजे 10 ते 20 ताेळे दागिने लंपास केले. अजनी पाेलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली व त्यामुळे खळबळ उडाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष हरिश्चंद्र रायबाेले (57, फफ्लॅट क्रमांक तीन, वसंतनगर) असे तक्रारदाराचे नाव आहे. ते प्राॅपर्टी डेव्हलपर्स आहेत. त्यांनी नुकताच बेसा परिसरात अलिशान बंगल्याचे बांधकाम सुरु असल्याची चर्चा आहे. मंगळवारी रात्री ते नियमित वेळेप्रमाणे झाेपले हाेते. रात्री एक ते पहाटे साडेचार वाजताच्या दरम्यान अज्ञात तीन चाेरट्यांनी घराच्या मागील दाराचे कुलूप ताेडून आत प्रवेश केला. चाेरट्यांनी घरात काेणत्याही प्रकारची नासधूस न करता फक्त कपाटातील लाॅकरमधून अंदाजे 20 ताेळे साेने, 2.55 रुपयांची राेख व एक माेबाईल फोन यासह आणखी काही माैल्यवान वस्तू लंपास केल्या. पहाटे साडेपाच वाजता रायबाेले झाेपेतून उठले असता त्यांच्या दिवाणाच्या शेजारी असलेले कपाट उघडे दिसले. लाॅकरमधील मुद्देमाल चाेरी गेल्याचे दिसताच त्यांच्या पायाखालची जमीन हादरली. त्यांनी लगेच अजनी पाेलिसांना माहिती दिली. पाेलिसांचे पथक घटनास्थळावर हजर झाले. घरातून चाेरी केलेल्या वस्तूंची किंमत लाखाेंच्या घरात असल्यामुळे वरिष्ठ अधिकाèयांनीही घटनास्थळाला भेट दिली. रायबाेले यांनी अजनी पाेलिस ठाण्यात तक्रार केली. पाेलिसांनी अज्ञात आराेपींविराेधात गुन्हा दाखल केला आहे.
सीसीटीव्हीमध्ये आराेपी कैद
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घराेडी करण्यासाठी तीन युवक आले हाेते. चाेरी केल्यानंतर ते पळून जाताना एका व्यक्तीच्या घरावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेèयांमध्ये ते कैद झाले. त्या युवकांना घरातील लाॅकर आणि पैशाबाबत माहिती हाेती. त्यामुळे यामध्ये कुणीतरी कुटुंबीयांना ओळखणारा युवक असावा, अशी शक्यता आहे. पाेलिसांनी सीसीटीव्ही ुटेज जप्त केल्याची माहिती समाेर आली आहे.