सज्जन शतीने संघ यात्रेत सहभागी व्हावे : रत्नपारखी

नाचणगाव रा. स्व. संघाचा विजयादशमी उत्सव

    दिनांक :09-Oct-2025
Total Views |
पुलगाव,
RSS Vijayadashami राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण, सामाजिक समरसता, नागरी शिष्टाचार, स्वजागरण या पंचपरिवर्तनाच्या माध्यमातून समाजाला सहभागी करून समाज व देशामध्ये परिवर्तन करण्याचे कार्य संघ करीत आहे. जगन्नाथाच्या रथयात्रेसारखी ही यात्रा सुरू आहे. सज्जनशतीने या यात्रेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग कार्यवाह दत्तात्रय रत्नपारखी यांनी केले.
 

 RSS Vijayadashami 
नाचणगाव संघ शाखेच्या ८ रोजी बाजार चौक येथे आयोजित विजयादशमी उत्सवात प्रमुख वते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्ञानरथ बहुउद्देशीय शिक्षण संस्था नाचणगावचे अध्यक्ष प्रवीण दानव होते. व्यासपिठावर तालुका संघ चालक अरविंद हलमारे हे होते.
रत्नपारखी पुढे म्हणाले की, विदेशी आक्रमणाच्या वेळी भारतीय राज्यकर्ते एकत्र आले नाही. त्यामुळे देश गुलामगिरीत गेला. अशावेळी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी राष्ट्रभक्तीने प्रेरित व्यक्तीचे निर्माण व्हावे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करण्यात आली. देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाले. परंतु हे स्वातंत्र्याचे टिकवायचे असेल तर देश व समाजाचा विचार करणारा व्यक्ती निर्माण झाला पाहिजे. म्हणून दैनंदिन संस्कारातून राष्ट्रनिर्माणाचा विचार करणारा स्वयंसेवक निर्माण करण्यासाठी संघाचे कार्य सुरू असल्याचे ते म्हणाले. प्रवीण दानव यांनी संघाच्या कामाची व्याप्ती वाढवणे आवश्यक असल्याचे सांगितले.
उत्सवापूर्वी गावातून पथसंचलन काढण्यात आले. योगासन व व्यायामयोग प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. सांघिक गीतानंतर सुभाषित आशिष एखंडे, अमृत वचन सतीश बनवाकडे, वैयक्तिक गीत सुनील एखंडे यांनी सादर केले. तालुका कार्यवाह मंगेश ठाकरे यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाला वर्धा नागरी बँकेचे माजी अध्यक्ष केशव दांडेकर, विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष प्रदीप पांडे, डॉटर हेडगेवार नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष जयंत ओक उपस्थित होते.