गिलचा मोठा खुलासा! 2027 वर्ल्ड कपमध्ये रोहित-विराटचा डंका राहील का?

    दिनांक :09-Oct-2025
Total Views |
नवी दिल्ली
India 2027 World Cup भारतीय वनडे संघात नेतृत्व बदल झाल्यानंतर निर्माण झालेल्या चर्चेला अखेर नवा मोड मिळाला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी वनडे संघाची घोषणा करताना बीसीसीआयने रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेत, युवा फलंदाज शुभमन गिलच्या हाती नेतृत्व सोपवलं. या निर्णयामुळे संपूर्ण देशभरात क्रिकेट चाहत्यांमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या भविष्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले. मात्र, नव्या कर्णधार शुभमन गिलने दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यामुळे या चर्चांना काही अंशी विराम मिळाला आहे.
 

India 2027 World Cup 
 
 
शुभमन गिलने आपल्या वक्तव्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचं संघातील महत्त्व अधोरेखित करताना स्पष्टपणे सांगितलं की, “रोहित शर्मा आणि विराट कोहली भाऊंनी भारतासाठी अनेक मोठे सामने जिंकले आहेत. अशा दर्जाच्या आणि अनुभवाच्या खेळाडूंची वनडे संघाला नितांत गरज आहे.”त्याच्या या विधानामुळे हे स्पष्ट होतं की रोहित आणि विराट सध्या तरी संघाच्या योजनांचा भाग आहेत. त्यामुळे 2027 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये ते खेळतील का, या प्रश्नावर अजूनही दारे पूर्णपणे बंद झालेली नाहीत.
 
 
ऑस्ट्रेलिया India 2027 World Cup दौऱ्यासाठी झालेल्या निवडीदरम्यान मुख्य निवडकर्ता अजीत अगरकर यांनी स्पष्ट केलं होतं की, “रोहित आणि विराट 2027 चा वर्ल्ड कप खेळतील याची हमी देता येत नाही.” त्यांच्या या विधानामुळे दोघांच्या निवृत्तीबाबत आणि भविष्यातील सहभागावर साशंकता निर्माण झाली होती. मात्र, शुभमन गिलने दिलेल्या समर्थनात्मक भूमिकेमुळे त्यांच्या पुनरागमनाची शक्यता अद्यापही कायम आहे.
 
 
याच पत्रकार परिषदेत शुभमन गिलने रोहित शर्माच्या नेतृत्वशैलीचे कौतुक करताना सांगितले की, “मी रोहित भाऊंकडून नेतृत्व कौशल्य शिकले आहे. ड्रेसिंग रूममध्ये त्यांनी कायम शांतता ठेवली आणि खेळाडूंशी मित्रत्वाचे नाते जोपासले. मी देखील तसंच करण्याचा प्रयत्न करेन.” त्याचबरोबर त्याने हेही जाहीर केलं की, त्याचे लक्ष्य सर्व फॉर्मेट्समध्ये भारतासाठी आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचं आहे.भारतीय संघ सध्या संक्रमणाच्या टप्प्यातून जात असून, तरुण खेळाडूंना संधी देण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु अशा काळातही अनुभवी खेळाडूंचं महत्त्व नाकारता येणार नाही, हे शुभमन गिलने आपल्या विधानातून स्पष्ट केलं आहे.ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली सहभागी असणार आहेत. त्यामुळे ही मालिका दोघांसाठी फार महत्त्वाची ठरणार आहे. त्यांच्या कामगिरीवरच त्यांच्या पुढील कारकिर्दीचा निर्णायक प्रभाव पडण्याची शक्यता आहे.
 
 
शुभमन गिलच्या India 2027 World Cup वक्तव्यानंतर रोहित आणि विराटच्या चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा आशेचा किरण निर्माण झाला आहे. नेतृत्वात बदल झाला असला, तरी भारतीय क्रिकेटमधील या दोन दिग्गजांची भूमिका अद्याप संपलेली नाही, हे मात्र नक्की.