चांदीने घेतली मोठी उसळी

-एकाच दिवसात चांदीच्या दरात १० हजाराने वाढ -वर्षभरात चांदीच्या सर्वाधिक वाढ

    दिनांक :09-Oct-2025
Total Views |
नागपूर,
silver-price : दसर्‍यानंतर आता दिवाळीपूर्वीच सोन्यासोबतच चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरवाढीचा ट्रेंड सुरु असल्याने ग्राहक संभ्रमात दिसून येत आहे. गुरुवारी सोने १,२३,३०० रुपये प्रति १० ग्रॅम असा दर होता. तर चांदी १,६५, ५०० रुपये रुपये प्रती किलोपर्यंत दर होता. बुधवारी सोने रुपये प्रति १० ग्रॅम म्हणजेच ७०० रुपयांनी वाढ झाली. तर चांदीचा दर बुधवारी १,५४,५००रुपये प्रती किलोपर्यंत दर होता. एकाच दिवसात १० हजार रुपयांनी वाढ नोंदविली. चांदीने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले असून आगामी काळात सुध्दा दर वाढ कायम राहण्याची शक्यता आहे.
 
 
SILVER
 
जागतिक बाजारपेठेतील अस्थिरता, रशिया -युक्रेन युद्ध आणि जिओ पोलिटिकल यामुळे चांदीच्या भावात मोठी वाढ झाली आहे. दिवसेंदिवस सोन्या चांदीचे भाव वाढत असले तरीही खरेदी करणारे ग्राहक वाढतच असल्याची माहिती इतवारीच्या सराफा व्यापार्‍यांनी दिली आहे.
 
 
चांदीच्या बाजारपेठेत गुरुवारी एक किलो चांदीसाठी १ लाख ६५ हजार ५०० रुपये मोजावे लागले. आगामी दहा दिवसानंतर दिवाळीपर्यंत चांदीचे भाव एक लाख ७५ हजार प्रती किलोपर्यंत जाण्याची शक्यता व्यापार्‍यांनी व्यक्त केली आहे.
दिवाळीच्या तोंडावर सोन्या चांदीच्या दर वाढीमुळे सोने खरेदीसाठी इच्छुक असलेल्या ग्राहकांची अडचण निर्माण झाली आहे. दहा दिवसात सोन्या चांदीच्या दरात वाढ होण्याचा अंदाज सराफा व्यावसायिकांनी दिला आहे.