लडाख : काँग्रेसची चिथावणी; सोनमचा खोडसाळपणा

    दिनांक :09-Oct-2025
Total Views |
चौफेर
मृदुल त्यागी
लेह-लडाखमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी. हिंसाचार, खाजगी आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान. लडाखचा तथाकथित पर्यावरणवादी नेता Sonam Wangchuk सोनम वांगचुक व त्याच्या समर्थकांच्या चिथावणीमुळे रक्तरंजित हिंसाचाराची आगीत हा प्रदेश होरपळला. परकीय निधीवर पोसलेले, स्वत:ची भरभराट करणारे आणि पाकिस्तानच्या मांडीवर बसलेले वांगचुकसारखे कार्यकर्ते बांगलादेश किंवा नेपाळसारख्या हिंसक आंदोलनांद्वारे भारतात सत्तापालट करण्याचा कट रचणार्‍या डीप स्टेटचा भाग आहेत. या डीप स्टेटरूपी दशाननाचा मुख्य चेहरा काँग्रेस आहे. परंतु सावलीच्या रूपात सोनम वांगचुकसारख्या मुखवटा घातलेल्या व्यक्ती देशाच्या कानाकोपर्‍यात पसरलेल्या आहेत.
 
 
Sonam-1Sonam-1
 
आता बौद्ध बहुसंख्य नाहीत
लडाख हा केंद्रशासित प्रदेश भारताचा मोरपंखी मुकुट आहे. मूळतः शांतताप्रिय बहुल प्रदेश असलेल्या लडाखमध्ये आता या धर्माचे अनुयायी अल्पसंख्यक झाले आहेत. लेह आणि कारगिल हे या प्रदेशातील दोन जिल्हे आहेत. कारगिलमध्ये मुस्लिम बहुसंख्य आहेत आणि लेहमध्ये बौद्ध बहुसंख्य आहेत. तथापि, या केंद्रशासित प्रदेशाच्या एकूण लोकसंख्येपैकी केवळ ३६ टक्के बौद्ध आहेत. Sonam Wangchuk  सोनम वांगचुक नावाचा एक माणूस बर्‍याच काळापासून लेहला भडकविण्याचा करीत आहे. तो कधी उपोषण करतो तर कधी पदयात्रा काढतो. तो एकीकडे लडाखमधील तरुणांसाठी रोजगाराच्या संधींची मागणी करतो, परंतु दुसरीकडे पर्यावरणाच्या नावाखाली तेथे कोणताही कारखाना, फॅक्टरी किंवा उद्योग स्थापन करण्यास विरोध करतो. मुळात विकासविरोधी असलेला वांगचुक हा परकीय निधीवर पोसलेला व्यक्ती असल्याचे म्हटले जाते.
 
 
विदेशी निधी आणि संस्थांचे जाळे
प्रत्येक देशात Sonam Wangchuk वांगचुक सारख्या विकासविरोधी व्यक्तींना आणि स्वयंसेवी संस्थांना पोसणार्‍या कुख्यात फोर्ड फाऊंडेशनकडून याला निधी प्राप्त होतो. जगभरातील देशांमध्ये सत्तापालट घडवून आणणारा कुख्यात अब्जाधीश जॉर्ज सोरोस याच्याविषयी तुम्हाला आधीच माहीत आहे. त्याच्या ‘ओपन सोसायटी’चे वांगचुकशी संबंधित संघटनांशी निकटचे संबंध आहेत. गुजरात दंगलीदरम्यान मुस्लिमांवरील ‘अत्याचाराच्या’ खोट्या कथा रचून अब्जावधी कमावणारी सध्या जामिनावर असलेली तथाकथित सेक्युलर कार्यकर्ती तिस्ता सेटलवाड हिच्याशीही सोनम वांगचूकचे निकटचे संबंध आहेत. अलीकडेच, सोनम वांगचूकने पाकिस्तानचा प्रवास केला आणि डॉन मीडिया ग्रुपच्या ‘ब्रीथ पाकिस्तान’ नामक कार्यक्रमात सहभाग घेतला होता. तिस्ता सेटलवाडची ‘क्विल फाऊंडेशन’ ही स्वयंसेवी संस्था देखील या कार्यक्रमात सहभागी असल्याचे वृत्त आहे. या निधीचा उपयोग करण्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांचे जाळे विणले आहे. हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह लडाख (एचआयएएल) हा आईस स्तूप प्रकल्प आहे, जो ‘स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाख’च्या माध्यमातून चालतो. म्हणजेच ही संस्था देखील वांगचुकचीच कठपुतळी आहे. वांगचुककडे निधी संकलनाचे आणखी एक साधन आहे. त्याला ‘क्राउड फंडिंग’ म्हणतात. परंतु या निधी (फंडिंग) प्रतिसाद म्हणून काही निवडक लोकच त्याच्या संस्थांना देणगी देतात. १९९५ मध्ये सोनम वांगचुकने ‘ऑपरेशन न्यू होप’ नावाने एक कार्यक्रम सुरू केला. सरकारी शाळांची स्थिती सुधारण्याच्या नावाखाली देणग्या देखील गोळा केल्या गेल्या. लक्षात घ्या की, यासाठी फोर्ड फाऊंडेशन व्यतिरिक्त ‘डॅन चर्च एड’ ने देखील निधी दिला.
 
 
ही संस्था मानवतावादी उद्देशांच्या ‘चर्चचा संदेश’ म्हणजेच मिशनरी उपक्रम पसरवण्याचे काम करते. याशिवाय, वांगचुकच्या संस्थेला टाटा ट्रस्ट आणि करुणा ट्रस्टकडूनही देणग्या मिळाल्या. वांगचुकशी संबंधित आणखी एक एनजीओ म्हणजे ‘लीड इंडिया’. या संस्थेला देखील मोठ्या प्रमाणात परदेशी देणग्या प्राप्त झाल्या आहेत. संशयास्पद परदेशी संस्थांची इंटरनॅशनल असोसिएशन फॉर लडाख स्टडीजवर भरपूर ‘कृपा’ आहे. २०१० ते पर्यंत, एकट्या फोर्ड फाऊंडेशनने वांगचुकच्या संस्थेवर वर पाच कोटी डॉलर्स खर्च केले आहेत.
 
 
काँग्रेसचा सहभाग
जर तुम्ही बांगलादेश आणि नेपाळमधील सत्तापालटांकडे पाहिले तर तुम्हालाही असाच पॅटर्न आढळेल. मोहम्मद युनूसपासून ते नेपाळमधील हिंसक आंदोलनापर्यंत. ही सर्व आंदोलने परकीय निधीच्या बळावर चालली आणि ऐन महत्त्वाच्या क्षणी, सरकार बदलण्यासाठी ‘डीप स्टेट’ चे म्हणून उदयास आली. Sonam Wangchuk सोनम वांगचुकने जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानीनंतर १५ दिवसांपासून सुरू असलेले आपले उपोषण सोडले. शांततेचे आवाहन करत त्याने मगरीचे अश्रू ढाळले. परंतु या हिंसाचाराच्या प्रसारात आणि अंमलबजावणीत काँग्रेसचा सहभाग नाकारण्यावर त्याने आपली सर्वाधिक शक्ती केंद्रित केली. काँग्रेस नेते हिंसाचार भडकवताना आणि स्वतः दंगलखोरांमध्ये सहभागी असल्याचे दाखवणारे असंख्य आणि व्हिडिओ उपलब्ध आहेत. काँग्रेसचे नगरसेवक फुंतसोग स्टॅनझिन त्सेपाग हा स्वतः दंगलखोर जमावाचे नेतृत्व करीत होता. याच दंगलखोरांनी लडाख भाजपा कार्यालय आणि लडाख हिल कौन्सिल कार्यालय जाळून टाकले होते. वस्तुस्थिती ही आहे की, बुडणार्‍या काँग्रेसच्या जहाजाला वांगचुकच्या रूपात आधार मिळाला आहे. निवडणुकीतील सलग पराभवांमुळे हताश-निराश झालेली काँग्रेस आणि तिचे राहुल गांधी तरुणांना भडकवणारी विधाने करीत आहेत. निवडणुकीत विजय मिळविणे कठीण आहे, हे या पक्षाला अनुभवातून कळून चुकले आहे. मग हिंसाचाराद्वारे सत्तापालट का करू नये? असा विचार या पक्षाच्या नेत्यांनी केल्यास नवल नाही. तथापि, या देशातील तरुण दिल्ली विद्यापीठापासून ते हैदराबाद विद्यापीठापर्यंत काँग्रेस पक्षाला नाकारत आहेत. या पक्षाची विद्यार्थी एनएसयूआयचा पूर्णपणे सुपडा साफ झाला आहे. तथापि, आता राहुल गांधींच्या अलीकडच्या वादग्रस्त विदेश दौर्‍यांची आणि वांगचुकच्या पाकिस्तान दौर्‍याची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. काही ना काही निमित्त करून, कुठले ना कुठले कारण सांगून काँग्रेस विविध राज्यांमध्ये हिंसाचाराला खतपाणी घालू शकते. आपण याचा सामना करण्यासाठी तयार असले पाहिजे. वांगचुक आता ढोंग करीत आहे. तथापि, भाजपाचे अमित मालवीय यांनी त्यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ते मास्क घालून तरुणांना आंदोलनाचे (हिंसा) तंत्र शिकवताना दिसत आहेत. यासंदर्भात खुद्द केंद्रीय गृह मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की वांगचुक यांनी आपल्या उपोषण आंदोलनादरम्यान अनेक भडकाऊ अर्थात चिथावणी देणारी केली. सोनमच्या चिथावणीखोर विधानांमुळे लडाखमधील हिंसाचार भडकला. सोनम वांगचुकचे देशविरोधी हेतू उघड झाल्यानंतर भारत सरकार आणि लडाख प्रशासनाने कठोर कारवाईला प्रारंभ केला. वांगचुकवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्या (एनएसए) अंतर्गत कारवाई करीत त्याला अटक केली आणि जोधपूरच्या तुरुंगात त्याची रवानगी केली. विदेशी निधीवर स्वत:ची भरभराट करणार्‍या या एनजीओ टोळीतील इतर सदस्यांवर ठेवणे देखील महत्त्वाचे आहे, कारण काँग्रेस पक्ष देशाच्या विविध भागात हिंसाचार भडकवण्याच्या संधी शोधत असल्याचे दिसते.
 
 
एनजीओची नोंदणी रद्द
केंद्र सरकारने सोनम वांगचुकच्या हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड लर्निंग (एचआयएएल) या स्वयंसेवी संस्थेची (एनजीओ) एफसीआरए नोंदणी रद्द केली आहे. सरकारने म्हटले आहे की एनजीओने वारंवार परकीय निधीशी संबंधित नियमांचे वारंवार केले आहे. लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा यासाठी Sonam Wangchuk वांगचुक यांच्या नेतृत्वाखालील निदर्शनांमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर ही कारवाई करण्यात आली. वांगचुकच्या एनजीओविरुद्ध सीबीआय चौकशी आधीच सुरू होती. याच्या आधी ऑगस्टच्या सुरुवातीला, लडाख प्रशासनाने एचआयएएलला केलेले जमीन वाटपही रद्द केले होते. प्रशासनाने सांगितले की ही जमीन वाटप केलेल्या उद्देशासाठी वापरली गेली नव्हती कोणताही भाडेपट्टा करार (लीज अ‍ॅग्रीमेंट) झाला नव्हता. विविध वृत्तांनुसार, २४ सप्टेंबर रोजी बंदच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून लेह शहरातील दुकाने बंद होती आणि लोक मोठ्या संख्येने एनडीएस स्मारक मैदानावर जमले होते. त्यानंतर त्यांनी सहावी अनुसूची आणि वेगळ्या राज्याच्या समर्थनार्थ घोषणा देत शहरातील रस्त्यांवरून मोर्चा काढला. काही लोकांनी भाजपा आणि हिल मुख्यालयावर दगडफेक केल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली. कार्यालयाच्या आवारात आणि इमारतीत फर्निचर आणि कागदपत्रे जाळण्यात आली. एका गटाने अनेक वाहने जाळली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस आणि निमलष्करी दलांनी अश्रुधुराचा वापर केला आणि गोळीबार केला. काही तासांच्या चकमकीनंतरच परिस्थिती नियंत्रणात आली.
 

- परदेशी निधी आणि पाकिस्तान-चीन समर्थक शक्तींमुळे ही आग विकासविरोधी अजेंडाचे थर उघड करते. डीप स्टेटचे हे कारस्थान राष्ट्रविरोधी आहे.
-लडाख हा केंद्रशासित प्रदेश भारताचा मोरपंखी मुकुट आहे. मूळतः शांतताप्रिय बौद्ध बहुल प्रदेश असलेल्या लडाखमध्ये आता या धर्माचे अनुयायी अल्पसंख्यक झाले आहेत. लेह आणि कारगिल हे या प्रदेशातील दोन जिल्हे आहेत. कारगिलमध्ये मुस्लिम बहुसंख्य आहेत आणि बौद्ध बहुसंख्य आहेत. तथापि, या केंद्रशासित प्रदेशाच्या एकूण लोकसंख्येपैकी केवळ ३६ टक्के बौद्ध आहेत.
- १९९५ मध्ये सोनम वांगचुकने ‘ऑपरेशन न्यू होप’ नावाने एक कार्यक्रम सुरू केला. सरकारी शाळांची स्थिती सुधारण्याच्या नावाखाली देणग्या देखील गोळा केल्या गेल्या. लक्षात घ्या की, यासाठी फोर्ड फाऊंडेशन व्यतिरिक्त ‘डॅन चर्च एड’ ने देखील दिला. ही संस्था मानवतावादी उद्देशांच्या नावाखाली ‘चर्चचा संदेश’ म्हणजेच मिशनरी उपक्रम पसरवण्याचे काम करते. वांगचुकशी संबंधित आणखी एक एनजीओ म्हणजे ‘लीड इंडिया’. या संस्थेला देखील मोठ्या प्रमाणात परदेशी देणग्या प्राप्त झाल्या आहेत.
(पांचजन्यवरून साभार)