राज्य उत्पादन शुल्क कार्यालयामार्फत छाप्यातून १३ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त

*महात्मा गांधी सप्ताहात कारवाई

    दिनांक :09-Oct-2025
Total Views |
बुलढाणा, 
state-excise-office-buldhana : जिल्ह्याच्या राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत जिल्ह्यात अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्रीवर प्रतिबंध घालण्यासाठी कारवाईचे सत्र सुरु आहे. याअंतर्गत २ ते ८ ऑटोबर या महात्मा गांधी सप्ताहाच्या कालावधीत जिल्ह्यातील हातभट्टी, अवैध मद्यविक्री केंद्रावर एकूण ९४ ठिकाणी छापे घालून गुन्हे नोंदविण्यात आले असून ९७ आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यात एकूण ७ वाहने आणि १३ लाख ६५ हजार ४२८ रुपये इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती प्र. विभागीय उप-आयुक्त डॉ. पराग नवलकर यांनी दिली आहे.
 
 
 
BUL
 
 
 
त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात ही कारवाईचे सत्र सुरु आहे. ही कारवाई बुलढाणा जिल्ह्यातील पांग्री उबरहंडे, उंबरखेड, भादोला, आंबेडकर नगर बुलढाणा, देऊळगाव धनगर, तुळजापूर, लोणी गवळी, अंजणी बु. अंबाशी, धोडप, खिरोडा, शेगाव, बेलखेड, कवठळ, मचिंदरखेड, पातुर्डा फाटा, मेहकर, लोणार, सुलतानपूर, देऊळगाव माळी इत्यादी ठिकाणी छापे टाकून करण्यात आली आहे. या कारवाईत जिल्ह्यातील सर्व निरीक्षक, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क व त्यांचे अधिनस्त कर्मचारी यांचा सहभाग होता.
 
 
बुलढाणा जिल्ह्यात अवैध दारु विक्री केंद्र, गावठी हातभटटी विक्री केंद्रांविरोधात व अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री वर प्रतिबंध घालण्यासाठी कार्यक्षेत्रीय निरीक्षक राज्य शुल्क, बुलढाणा, खामगाव, देऊळगाव राजा व निरीक्षक भरारी पथक बुलढाणा यांच्या नियंत्रणाखालील विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील अवैध मद्य विक्री व निर्मिती विरोधी विशेष मोहिमेत २५ ठिकाणी छापे टाकून जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. डॉ. पराग मो. नवलकर अधीक्षक राज्य उत्पादन बुलढाणा
या कार्यवाहीमध्ये निरीक्षक आय. एन. वाघ, निरीक्षक आर.एन.रोकडे, निरीक्षक व्ही.एम.पाटील भरारी पथकातील निरीक्षक बोनावर, यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक शिंदे, आर. के. विठोरे, सतिष पाटील, रोटे, नयना देशमुख, शिवनाथ भगत, आर. एन. गावंडे, कुटेमाटे रमेश विठारे यांच्या नेतृत्वात तसेच त्यांच्या अधिनस्त कार्यरत जवान संवर्गीय कर्मचारी यांच्या सहभागाने ही मोहीम पार पाडण्यात आली.