संपकरी वीज अधिकारी-कर्मचाऱ्यांची निदर्शने

-80 टक्के प्रतिसादाचा दावा

    दिनांक :09-Oct-2025
Total Views |
नागपूर, 
nagpur-news : महाराष्ट्र वीज उद्योगातील तिन्ही वीज कंपन्यातील एक लाख कर्मचारी, अभियंते व अधिकारी यांच्या 7 संघटनांनी महाराष्ट्राच्या वीज उद्योगाच्या खाजगीकरण धोरणाविरुद्ध व इतर मागण्यांसाठी पुकारलेल्या संपास 80 टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा केला आहे.
 
 
 
09-oct-36
 
 
 
नागपूर जिल्ह्यातील महावितरण, महापारेषण व महानिर्मितीमधील हजारो कर्मचारी, अभियंते अधिकारी व महिला कर्मचाèयांनी काटोल रोडवरील मुख्य अभियंता कार्यालयासमोर उभारलेल्या विशाल मंडपात धरणे व सभेचे आयोजन केले होते. ज्येष्ठ कामगार नेते मोहन शर्मा यांच्या अध्यक्षतेत आयोजित सभेत सातही संघटनांच्या पदाधिकाèयांनी 72 तासांचा संप यशस्वी करण्याचे आवाहन केले.
 
 
कोणत्याही आर्थिक मागणीसाठी हा राज्यव्यापी संप नसून वीज उद्योगाच्या खाजगीकरणाविरुद्ध व शासकीय कंपन्यांचे अस्तित्व अबाधित ठेवण्यास्तव हा संप असल्याचे कृती समिती पदाधिकाèयांनी भाषणात सांगितले. संयम व शांततेने सुरू असलेला संप फोडण्याच्या उद्देशाने शासनाने मेस्मा लावला, नोकरीतून काढण्याची, सेवा खंडित करण्याची व पगार कपातीची धमकी दिल्याचा आरोप संपकèयांचा आहे.
 
 
पी. व्ही. नायडू, सुशांत श्रुंगारे, प्रकाश निकम, राजेश पोफळी, राहुल लांजेवार, डॉ. अविनाश आचार्य, सुभाष मुळे, विजय क्षीरसागर (इंटक), यांनी सभेत मार्गदर्शन केले. इंटक फेडरेशन व महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी सेना या दोन्ही संघटना संपात सहभागी झाल्याची घोषणा करण्यात आली.
 
 
बहुतांश संपात सहभागी असल्याने तिन्ही कंपन्यांच्या विविध कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता. अत्यल्प उपस्थितीमुळे ही कार्यालये ओस पडल्याचे चित्र होते. वीज निर्मिती व पुरवठा सुरळित असल्याने नागरिकांना संपाचा त्रास जाणवला नाही. उद्या व परवा झळ बसू शकते, अशी चर्चा होती.