वणी,
vani-rss-vijayadashami-festival : वणी नगराचा विजयादशमी उत्सव शनिवार, 11 ऑक्टोबरला येथील पाण्याच्या टाकीजवळील शासकीय मैदानावर संध्याकाळी 6.15 वाजता होणार आहे.
या उत्सवात प्रमुख वक्ते म्हणून सेवांकुर संस्थेचे प्रांत कोषाध्यक्ष तथा सुप्रसिद्ध डॉ. प्रणाम अनिल सदावर्ते मार्गदर्शन करणार आहेत. या प्रसंगी अतिथी म्हणून विदेही सद्गुरू जगन्नाथ महाराज संस्थान भांदेवाडा येथील अध्यक्ष बबन धानोरकरे उपस्थित राहणार आहेत. या उत्सवात मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नगर संघचालक किरण बुजोने यांनी केले आहे.