गांजा विक्रेता गळाला, २.८०० किलोग्रॅम गांजा जप्त

    दिनांक :09-Oct-2025
Total Views |
देवळी, 
devali-ganja-seized : नजीकच्या वायगाव (नि.) येथील गांजा विक्रेता शाहबाज रफीक काजी (३०) रा. वायगाव (नि.) देवळी पोलिसांच्या गळाला लागला. ८ रोजी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या कारवाईत देवळी पोलिसांनी २ किलो ८०० ग्रॅम गांजा जप्त केला.
 
 
 
jlk
 
 
 
शाहबाज रफीक काजी याने मोठ्या प्रमाणात गांजाची साठवणूक करून तो त्याची अवैध विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. देवळी पोलिसांच्या चमूने वायगाव गाठून छापा टाकून त्याच्या घराची पाहणी केली. या झडतीमध्ये पोलिसांना २ किलो ८०० ग्रॅम गांजा मिळून आला. पोलिसांनी ७० हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी देवळी पोलिस ठाण्यात शाहबाज रफीक काजी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक अमोल मंडळकर, पोलिस उपनिरीक्षक प्रकाश निमजे, अमोल अलवडकर, स्वप्निल वाटकर, मनोज नप्ते, नितेश पाटील, कैलास पेटकर यांनी केली.